Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Health Tips: कडाक्याच्या उन्हाळ्यात डोकेदुखीने हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून कायमचा मिळवा आराम

तापमानात वाढ झाल्यानंतर कायमच डोकेदुखीची समस्या उद्भवू लागते. अशावेळी कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. यामुळे शरीराला आराम मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2026 | 01:30 PM
कडाक्याच्या उन्हाळ्यात डोकेदुखीने हैराण झाला आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून कायमचा मिळवा आराम

कडाक्याच्या उन्हाळ्यात डोकेदुखीने हैराण झाला आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून कायमचा मिळवा आराम

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. कडक ऊन, सतत बदलणारे वातावरण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बाहेरील वाढत्या तापमानामुळे कायमच डोकेदुखीचा त्रास होतो. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे केवळ थकवाचं नाहीतर डोकेदुखीचा त्रास सुद्धा वाढतो. बऱ्याचदा डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. उन्हामुळे वाढलेला डोकेदुखीचा त्रास संपूर्ण दिवसभर तसाच कायम राहतो. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर मेडिकलमधील गोळी आणून खाल्लली जाते. पण असे केल्यामुळे किडनीवर त्याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर हे घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

Drinking Water: सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे का आहे फायदेशीर? जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण

डोके दुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय:

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. पाण्यासोबतच नारळ पाणी, ताक आणि इतर थंड पेयांचा आहारात समावेश करावा. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे नियमित ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय लिंबूपाणी, ताक, नारळपाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यासोबतच तुम्ही कायमच फ्रेश आणि टवटवीत राहाल.

तापमानात वाढ झाल्यानंतर कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसेच दुपारी १ ते ३ च्या दरम्यान उन्हातून कुठेही बाहेर जाऊ नये. उन्हाळ्यात बाहेर जात असाल तर सोबत टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. याशिवाय सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित बाहेर जाताना सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचा आणि आरोग्याचे कोणतेही नुकसान होत नाही.

स्मार्टफोनच्या व्यसनाने चिमुकल्यांच्या मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, संशोधनात खुलासा; या वयोगटातील मुलं सर्वात जास्त असुरक्षित

उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर डोके दुखीचा त्रास चालू झाल्यास थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. तसेच वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यात रुमाल बुडवून डोक्यावर घड्या ठेवाव्यात. यामुळे काहीवेळापुरते थंड वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील आवश्यक घटक बाहेर पडून जातात. ते वाढवण्यासाठी पौष्टिक आहार आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय उष्णता वाढल्यानंतर सहज पचन होणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन करावे.तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उन्हाळ्यात डोकेदुखी का होते?

    Ans: उष्णता, डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता), जास्त उन्हात फिरणे आणि झोपेची कमतरता यामुळे डोकेदुखी होऊ शकते.

  • Que: डोकेदुखी कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय उपयुक्त आहेत?

    Ans: डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवणे, लिंबूपाणी पिणे, पुदिन्याचा वापर करणे आणि पुरेसे पाणी पिणे फायदेशीर ठरते.

  • Que: डोकेदुखी टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: भरपूर पाणी प्या, उन्हात जाणे टाळा, हलका आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या.

Web Title: Suffering from a sweltering summer headache then get permanent relief by doing these home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Headache pain
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी
1

ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी
2

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ
3

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय
4

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.