Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : गॅस, ॲसिडिटी, अपचनाचा होतोय त्रास? पोटाच्या समस्यांपासून मिळेल अराम; घरी बनवा चटकदार ‘आवळा पुदिन्याची चटणी’

Aamla Pudina Chutney Recipe : आवळा रोगप्रतिकारकशक्ती वाढवतो तर पुदिना शरीराला थंड ठेवतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही याची चटकदार चटणी बनवून खाऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 21, 2026 | 09:35 AM
Recipe : गॅस, ॲसिडिटी, अपचनाचा होतोय त्रास? पोटाच्या समस्यांपासून मिळेल अराम; घरी बनवा चटकदार 'आवळा पुदिन्याची चटणी'

Recipe : गॅस, ॲसिडिटी, अपचनाचा होतोय त्रास? पोटाच्या समस्यांपासून मिळेल अराम; घरी बनवा चटकदार 'आवळा पुदिन्याची चटणी'

Follow Us
Follow Us:
  • चुकीच्या खाण्यापिण्यामुळे पोटाच्या समस्या जाणवू लागतात.
  • पोटाच्या समस्या या घरगुती उपायानेही दूर करता येतात.
  • उन्हाळ्यात पोटाला आराम मिळवून देण्यासाठी तुम्ही घरी आवळा-पुदिन्याची चटणी बनवू शकता.
खाण्याच्या ताटात चटणीचा समावेश हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. साध्या जेवणालाही चटणीमुळे एक वेगळी चव आणि ताजेपणा मिळतो. विशेषतः घरगुती चटण्या या केवळ चव वाढवण्यासाठी नसून त्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पचन सुधारण्यासाठी मदत करणारे पदार्थ खाणे गरजेचे असते. अशा वेळी आवळा आणि पुदिना यांचा वापर करून बनवलेली चटणी ही उत्तम पर्याय ठरते.

Recipe : ना मैदा ना गव्हाचं पीठ, एकदा घरी बनवून पहा कुरकुरीत ‘रवा पुरी’

आवळा हा नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सीने समृद्ध असून तो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतो. पुदिना हा थंड गुणधर्म असलेला असून तो पचनक्रिया सुधारतो आणि शरीरातील उष्णता कमी करतो. ही चटणी नियमित आहारात घेतल्यास गॅस, ॲसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या कमी होऊ शकतात. भात, पोळी, पराठा किंवा पुलाव यांसोबत ही चटणी अतिशय रुचकर लागते. मिक्सरमध्ये पटकन तयार करता येते, मात्र पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यात कुटून बनवलेली चटणी अधिक सुगंधी आणि चविष्ट लागते. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 2 आवळे (बी काढून स्वच्छ धुतलेले)
  • 1 कप पुदिन्याची पाने (नरम)
  • 1 ते 2 हिरव्या मिरच्या
  • 2 लसूण पाकळ्या
  • अर्धा चमचा जिरे
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार थोडे पाणी
वजन कमी करायचंय? पण चवदारही खायचंय? मग आजच घरी बनवा मसालेदार ‘Quinoa Khichdi ‘

कृती:

  • सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुऊन त्यातील बी काढा. पुदिन्याची पाने निवडून स्वच्छ करा.
  • दुसरकडे हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे तयार ठेवा.
  • सर्व साहित्य बारीक चिरून घ्या. आता हे मिश्रण खलबत्त्यात टाकून हळूहळू कुटा.
  • काही वेळात दरदरीत, सुगंधी चटणी तयार होईल.
  • जर मिक्सर वापरायचा असेल, तर सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • ही चटणी 1 ते 2 दिवस चांगली टिकते.
 

Web Title: Suffering from gas acidity or indigestion then make make a tasty amla mint chutney at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
1

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर
2

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात
3

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी
4

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.