Rava Puri Recipe : आपण आजवर मैदा आणि गव्हाची पुरी खात आलो आहोत, पण तुम्ही कधी रव्याची पुरी खाल्ली आहे का? चवीचा खुसखुशीत लागणारी ही पुरी आरोग्यासाठीही एक चांगला पर्याय ठरते.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
सणसमारंभात घरी कुरकुरीत पुरी बनवली जाते.
ही पुरी अधिकतर मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते.
पण तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही रव्याची पुरी देखील बनवू शकता.
रवा पुरी ही एक अतिशय कुरकुरीत, चविष्ट आणि पटकन तयार होणारी स्नॅक डिश आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. विशेषतः सण, पार्टी किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळं खायचं असेल, तर रवा पुरी हा उत्तम पर्याय ठरतो. साध्या घटकांपासून तयार होणारी ही पुरी बाहेरून खुसखुशीत आणि आतून हलकी असते. पारंपरिक पुरीपेक्षा ही थोडी वेगळी असून तिचा खास रव्याचा टेक्स्चर तिला अधिक चवदार बनवतो. घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामुळे ही रेसिपीकधीही पटकन करून पाहता येते.