हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी सोपे घरगुती उपाय
जर तुम्हाला थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यात अडचण, चक्कर येणे आणि फिकट त्वचा यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर हे रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असू शकते. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशी (RBCs) मध्ये आढळते जे शरीरात ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात. हिमोग्लोबिनची पातळी काय असावी? ते पुरुषांमध्ये 13.8 ते 17.2 g/dL, महिलांमध्ये 12.1 ते 15.1 g/dL आणि मुलांमध्ये 11 ते 16 g/dL असावे. त्याच्या कमतरतेमुळे लोहाची कमतरता, रक्तस्त्राव, जुनाट आजार, सिकलसेल ॲनिमिया, थकवा, अशक्तपणा, धाप लागणे, चक्कर येणे आणि त्वचा फिकट पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय करावे? यासाठी लोहयुक्त पदार्थ खावेत. योगगुरू बाबा रामदेव यांनी काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुमची हिमोग्लोबिनची पातळी फक्त एका आठवड्यात 7 ते 14 g/dL पर्यंत वाढू शकते, जाणून घ्या महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
हिमोग्लोबिन कसे वाढेल
बाबा रामदेव यांनी सांगितले की, हा उपाय केवळ एका आठवड्यात हिमोग्लोबिनची पातळी 7 वरून 14 पर्यंत वाढवेल. रामदेव म्हणाले की, त्यांनी स्वतः ही रेसिपी करून पाहिली आहे जी अत्यंत उपयुक्त ठरते. रामदेव बाबांच्या म्हणण्याप्रमाणे, ही रेसिपी प्रभावी आहे ती नेहमी वापरत आल्याचेही आवर्जून सांगितले. तसंच गेल्या 30 वर्षांपासून आपेल हिमोग्लोबिन 17.5 वर राखण्यात यश मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यासाठी कोणते पदार्थ खावेत वा काय प्यावे जाणून घ्या.
गाजर-बीट ज्युस
गाजर आणि बिटाच्या रसाचे सेवन
गाजर आणि बीटरूट ज्यूस बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे, काही गाजर, एक मोठे बीटरूट आणि एक मोठे डाळिंब. या गोष्टी सोलून, नीट धुवून मिक्सर ज्युसरमध्ये टाकून रस काढा. याचे सतत सेवन केल्याने तुमचे हिमोग्लोबिन वाढू शकते असा सल्ला बाबा रामदेव यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिला आहे.
रताळ्याचे सेवन
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खा रताळे
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी हिवाळ्यात उपलब्ध होणारे रताळे हा उत्तम उपाय आहे. आपण रताळे गॅसवर शेकू शकता किंवा रताळ्याची भाजी वा त्याचा किस करून खाऊ शकता. रताळे नुसते उकडवून खाणेही लाभदायक आहे. याशिवाय रताळ्यात लिंबाचा रस मिसळून खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात.
खजूर आणि अंजीराचे सेवन
अंजीर आणि खजुराचा करा उपयोग
अंजीर आणि खजूरमध्ये लोह चांगल्या प्रमाणात आढळते. त्यांचे नियमित सेवन केल्याने अशक्तपणा टाळता येतो. या दोन गोष्टींमध्ये तुम्ही मनुका मिसळा आणि रात्रभर भिजवा. तर सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण खा आणि पाणी प्या. याशिवाय हिवाळ्यात तुम्ही गूळही खाऊ शकता जो लोहाचा चांगला स्रोत आहे. यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी उत्तम राहते
ऊसाचा रस
उसाचा रस प्यावा
हिवाळ्यात ऊस सहज मिळतो आणि अनेक ठिकाणी उसाचा रसही मिळतो. हिमोग्लोबिन वाढवण्याचा हा सर्वात स्वस्त मार्ग आहे. रामदेव बाबा म्हणाले की, उसाचा रस एक सुपर टॉनिक आहे. त्यामुळे यकृतही चांगले राहते आणि कावीळही बरी होते. मात्र डायबिटीसच्या रूग्णांनी याचे सेवन अधिक करू नये. तसंच ऊसाच्या रसाचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
गवती चहा
लेमनग्रास ठरेल फायदेशीर
गवती चहा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास उपयुक्त आहे. आपण कोणत्याही नर्सरीमधून ते सहजपणे मिळवू शकता. त्याचा रस तयार करण्यासाठी तुम्हाला कोरफड, गवती चहा, डाळिंब आणि बीटरूट आवश्यक आहे. हे सर्व मिक्सरमध्ये टाकून रस तयार करा आणि नियमित याचे सेवन करावे.
शरीरात कमी झालेली हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात करण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे?
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.