हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी संतुलित आणि पौष्टीक आहार घेणे आवश्यक आहे. कारण शरीरातील रक्ताची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात असणे फार गरजेचे आहे. हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यानंतर शक्तपणा, थकवा, श्वास घेण्यास त्रास, आणि थंड वातावरणात अंग थरथर कापणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शिवाय घरगुती पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘या’ आजाराच्या रुग्णांनी खाऊ नये जास्त बिया असलेली फळं, काय सांगतात तज्ज्ञ
मनुके आणि खजूर खाल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. मनुक्यांमध्ये फॉलिक असिड आढळून येते, ज्यामुळे रक्तातील लाल पेशी वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित मूठभर मनुक्यांचे सेवन करावे. तसेच खजूर खाल्यानेसुद्धा रक्तातील लाल पेशी वाढवण्यास मदत होते. खजूर खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
पालेभाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम आणि जीवनसत्वे आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात एकतरी पालेभाजीचे सेवन करावे. पालेभाज्या खायला काहींना आवडत नाही, पण पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पालक खाल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. तसेच पालकेचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तनिर्मिती प्रक्रियेला चालना मिळते.
फ्लॉवर प्रमाणे दिसणारी हिरव्या रंगाची ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. ब्रोकोलीमध्ये विटामिन C आणि आयर्न दोन्ही भरपूर प्रमाणात आढळून येते. शिवाय अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ कमी होऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही ब्रोकोलीपासून सूप किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवून खाऊ शकता.
लोहयुक्त बीटचे सेवन केल्यामुळे शरीरात रक्ताची आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढत जाते. बीटचा रस नियमित प्यायल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आयर्न आणि फॉलिक असिड असलेले बीट रक्तभिसरण सुधारण्यासाठी मदत करते. शिवाय नियमित सॅलड म्हणू सुद्धा तुम्ही बीट खाऊ शकता. आठवडाभर नियमित बीट खाल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: गूळ खाण्याचे नेमके काय असतात फायदे? जाणून घ्या.
चॉकलेटचे सेवन केल्याने सुद्धा हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. नियमित चॉकलेट खाल्यास 11.9 Mg आयर्नची पातळी वाढण्यास मदत होईल. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवू नये म्हणून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चॉकलेटचे सेवन करावे. यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग सुद्धा निघून जातील.