Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरड्यांना सूज येऊन वारंवार रक्त येतं? मग एम्स डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ नक्की करून पहा, तोंडाच्या दुर्गंधीपासून मिळेल सुटका

दात आणि हिरड्यांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. दातांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कायमच दात स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 24, 2025 | 11:32 AM
हिरड्यांना सूज येऊन वारंवार रक्त येतं? मग एम्स डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' नक्की करून पहा

हिरड्यांना सूज येऊन वारंवार रक्त येतं? मग एम्स डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' नक्की करून पहा

Follow Us
Close
Follow Us:

दातांच्या समस्या कोणत्या कारणांमुळे वाढतात?
दात स्वच्छ करण्यासाठी उपाय?
हिरड्यांमधून वारंवार रक्त का येते?

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दातांच्या काहींना काही समस्या उद्भवत असतात. कधी दात दुखणे तर कधी दातांमधून रक्त येणे. मात्र वारंवार उद्भवणाऱ्या दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव, सूज, हिरड्यांमध्ये वाढलेल्या वेदना, सतत दुर्गंधी येणे, दातांमधील वाढलेले अंतर, चघळताना वेदना, दात सैल होणे, हिरड्यांमध्ये पू किंवा थंड पदार्थांचे सेवन केल्यानंतर संवेदना जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हिरड्यांसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर अतिशय स्पष्ट लक्षणे दिसून येतात. कामाच्या धावपळीमध्ये दातांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही.(फोटो सौजन्य – istock)

किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच सावध होऊन शरीराची घ्या काळजी

भारतामध्ये सुमारे ५० टक्के लोक दात आणि हिरड्यांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. हिरड्यांच्या आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला अतिशय सौम्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने या लक्षणांमध्ये वाढ होत जाते. दातांभोवती असलेल्या ऊतींचा संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरड्यांना आलेली सूज आणि दातांमधून वारंवार रक्त येणे इत्यादी दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नवी दिल्लीतील एम्स डॉक्टरांनी सांगितलेले काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास दात आणि हिरड्यांच्या संसर्गापासून कायमची सुटका मिळेल.

हिरड्यांचा आजार कसा होतो?

नियमित खाल्लेले अन्नपदार्थांचे कण दातांमध्ये तसेच चिटकून राहतात. त्यामुळे दातांवर हळूहळू प्लेक नावाचा एक चिकट, बॅक्टेरियाचा थर जमा होतो. नियमितपणे ब्रश आणि फ्लॉस योग्यरित्या न केल्यामुळे दातांच्या भोवती चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. जमा झालेला प्लेक टार्टरमध्ये घट्ट होऊन बसतो, जो काढणे सुद्धा अतिशय कठीण आहे. दातांच्या आजारांची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर वेळीच उपचार करावे. हिरड्यांमधून रक्त येणे, वेदना किंवा सूज येणे, तोंडाची दुर्गंधी येणे, दात सैल होणे, दात आणि हिरड्यांमधील वाढणारी अंतर इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

स्वयंपाक घरातील चिमूटभर दालचिनी झपाट्याने कमी करेल पोटावर वाढलेला चरबीचा घेर! जाणून घ्या शरीराला होणारे वेगवेगळे फायदे

हिरड्यांच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय:

नेहमीच दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. दात स्वच्छ न केल्यामुळे हिरड्या आणि दात खराब होऊन जातात. दिवसभरात दोनदा किंवा तीनदा टूथपेस्टचा वापर करून ब्रश करावा. तसेच दातांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मिठाचा वापर करावा. मिठाच्या वापरामुळे दात स्वच्छ होण्यासोबतच हिरड्यांच्या वेदनांपासून सुद्धा आराम मिळतो. दातांवर जमा झालेला प्लेक काढण्यासाठी स्केलिंग करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दात स्वच्छ करण्यासाठी कोणती पद्धत वापरावी?

    Ans: दिवसातून दोनदा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे आवश्यक आहे.

  • Que: दातांच्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी टाळाव्यात?

    Ans: चॉकलेट, कँडी आणि इतर गोड पदार्थ कमी खा

  • Que: दातांच्या आरोग्यासाठी काय खावे?

    Ans: दूध, दही आणि चीज यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ खा.

Web Title: Swollen gums and frequent bleeding then try this recommended by aiims doctors teeth care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Bright teeth
  • teeth home remedies
  • teeth problems

संबंधित बातम्या

दातांना लागलेली कीड होईल कायमची नष्ट! रामदेव बाबांनी सांगितलेला ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, तोंडाच्या दुर्गंधीपासून मिळेल कायमची सुटका
1

दातांना लागलेली कीड होईल कायमची नष्ट! रामदेव बाबांनी सांगितलेला ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, तोंडाच्या दुर्गंधीपासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.