फुफ्फुसांना सूज आल्यानंतर शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे
निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव फार महत्वाचा आहे. त्यातील शरीरातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फुफ्फुस. फुफ्फुस शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग आहेत. श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये फुफ्फुस अत्यंत महत्वाचे काम करतात. पण फुफ्फुसांचे कार्य बिघडले तर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. फुफ्फुस शुद्ध हवा घेऊन शरीरातील कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडण्याचे काम करतात. त्यामुळे फुफ्फुस निरोगी असणे आवश्यक आहे. शरीरातील एका अवयवात बिघाड झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बदलून जाते. यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. मात्र हल्लीच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम थेट शरीरावर होत असल्यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडले आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप, कामाचा तणाव इत्यादी अनेक कारणांमुळे फुफ्फुसांचे कार्य बिघडून जाते. फुफ्फुसांसंबधित उद्भवणारी अत्यंत महत्वाची समस्या म्हणेज फुफ्फुसांना सूज येणे. फुफ्फुसांना सूज आल्यानंतर दमा, न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस इत्यादी गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. संसर्ग, ऍलर्जी, धूळ, धूम्रपान, चुकीची जीवनशैली इत्यादी अनेक गोष्टींमुळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आजू आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये सूज आल्यानंतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
फुफ्फुसांना सूज आल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यातील महत्वपूर्ण समस्या म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे. अशावेळी श्वास घेताना पूर्णपणे श्वास घेता नाही. यामुळे शरीराचे कार्य बिघडते. त्यामुळे अशी लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आराम मिळवावा.
फुफ्फुसांना सूज आल्यनंतर सतत खोकला येण्यास सुरुवात होते. खोकला आल्यानंतर फुफ्फुसांमध्ये सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत खोकल्याचा त्रास वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
श्वास घेताना किंवा खोकताना छातीमध्ये वेदना होऊ लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावे. अन्यथा फुफ्फुसांना आलेली सूज वाढण्याची शक्यता असते. फुफ्फुसांना सूज आल्यानंतर छातीवर दाब पडतो, ज्यामुळे छातीमध्ये दुखू लागते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे ही सामान्य समस्या असली तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावे. फुफ्फुसांना सूज आल्यानंतर थकवा अशक्तपणा जाणवू लागतो.