Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे किडनीसंबंधित गंभीर आजार होतात. लघवी बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहिल्यामुळे किडनीवर जास्तीचा तणाव येतो आणि आरोग्य बिघडते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 12:00 PM
जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार

Follow Us
Follow Us:

किडनीच्या आजारांची लागण का होते?
जास्त वेळ लघवीला न गेल्यास उद्भवणाऱ्या समस्या?
किडनीसंबंधित आजार कोणते?

दीर्घकाळ निरोगी आणि कायमच हेल्दी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव सक्रिय असणे आवश्यक आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकते याशिवाय असंख्य कामे किडनी करते. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे किंवा ऑफिसमधील मीटिंग, लांबचा प्रवास, शाळा कॉलेजमध्ये वॉशरूम नसल्यामुळे लघवीला जाण्यास मिळत नाही. शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. तर काहीवेळा जास्त काम असल्यामुळे लघवीला जाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे लघवी थांबवून ठेवली जाते. पण सतत लघवी थांबवून ठेवल्यामुळे किडनीसंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

किडनी शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. पण जास्त वेळ लघवी थांबून ठेवल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी तसेच साचून राहतात. लघवी कधी करावी हे संकेत शरीर कायमच देत असते. जास्त वेळ लघवी थांबवून ठेवणे हे किडनी, ब्लॅडर आणि पूर्ण यूरिनरी सिस्टीमसाठी घातक ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्त वेळ लघवी थांबवून ठेवल्यामुळे शरीराला कोणत्या गंभीर आजारांची लागण होते. किडनीसंबंधित आजार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

किडनीसाठी घातक ठरणाऱ्या सवय:

किडनी शरीरातील रक्त स्वच्छ करण्यासाठी सतत लघवी तयार करते. पण ज्यावेळी लघवी रोखून ठेवली जाते, तेव्हा ती यूरिन ब्लॅडरमध्ये जमा होते. हा दबाव जास्त काळ राहिल्यास किडनीवर जास्तीचा तणाव येतो. किडनीवर आलेल्या जास्तीच्या तणावामुळे किडनीचे आरोग्य बिघडून जाते. लघवीच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन, बॅक्टेरिया आणि अतिरिक्त मीठ बाहेर पडून जाते. त्यामुळे लघवी रोखून धरल्यास विषारी घटक शरीरात तसेच साचून राहतात. यामुळे हळूहळू किडनी निकामी होते आणि रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात.

सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

किडनीसंबंधित गंभीर आजार कोणते?

जास्त वेळ लघवीला न गेल्यास त्यातील बॅक्टेरिया बाहेर पडून जाण्याऐवजी तसेच साचून राहतात. मूत्रमार्गात वाढलेल्या इन्फेक्शनचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच लघवीला झाल्यानंतर योग्य वेळी लघवीला जावे. यूटीआयची लागण झाल्यानंतर लघवीमध्ये जळजळ, पुन्हा पु्न्हा तहान लागणे, लघवी कमी येणे, लघवीतून दुर्गंधी, पोट किंवा कंबर दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. महिलांना प्रामुख्याने युटीआय इन्फेक्शनचा धोका असतो.याशिवाय किडनी स्टोन, ब्लॅडरचे स्नायू कमजोर होणे, किडनी डॅमेज होणे इत्यादी अनेक गंभीर आजार होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी खराब होण्याची लक्षणे कोणती?

    Ans: पाय, घोटा किंवा चेहऱ्यावर सूज येणे, लघवीच्या सवयींमध्ये बदल

  • Que: किडनी खराब होण्याची मुख्य कारणे काय आहेत?

    Ans: रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनीला इजा होते.

  • Que: किडनी खराब झाल्यास पूर्णपणे बरी होऊ शकते का?

    Ans: तीव्र (Acute) किडनी इंजरी वेळेवर औषधोपचार केल्यास बरी होऊ शकते. मात्र, क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) पूर्णपणे बरा होत नाही.

Web Title: The habit of holding urine for a long time is dangerous for the body these serious diseases can occur related to kidney

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Kidney Health Tips
  • Kidney Transplant

संबंधित बातम्या

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका
1

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व
2

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल
3

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
4

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.