
'या' पद्धतीने जेवण बनवणे पडले दीपिका कक्कडला महागात
दैनंदिन आयुष्य जगताना बऱ्याचदा आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मात्र शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका कक्कडला लिव्हर कॅन्सरचे निदान झाले आहे. तिला दुसऱ्या टप्प्यातील लिव्हर कॅन्सरचे निदान झाले आहे. रोजच्या आहारातील चुकीच्या सवयी आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. जंक फूडचे अतिसेवन, चुकीच्या पद्धतीने बनवलेला आहार, अपुरी झोप, सतत उद्भवणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे नियमित ताजे आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
दीपिका कक्कडच्या वाईट सवयी तिच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरल्या आहेत. तिच्या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोनची समस्या निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर लिव्हर कॅन्सरचे निदान झाले. दैनंदिन आहारात काहींना सतत तेलकट किंवा अतितिखट पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र याच सवयी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? लिव्हरच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उच्च तापमानात शिजवलेले अन्नपदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. स्टार्चयुक्त पदार्थ , बटाटा, पापड किंवा चकल्या खाल्यामुळे शरीरात अतिरिक्त स्टार्च वाढत जातात. अन्नपदार्थांवर ही प्रक्रिया केल्यानंतर अॅक्रिलामाइड नावाचे रसायन शरीरामध्ये गेल्यानंतर कॅन्सरच्या पेशींमध्ये वाढ होऊ लागते. त्यामुळे नेहमीच चवीला चमचमीत लागणारे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात.