अचानक येईल हार्ट अटॅक! महिनाभर आधी शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
हल्ली धावपळीच्या जीवनशैलीमुळे सगळेच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर योग्य वेळी लक्ष दिल्यास रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात सतत होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार घेऊन आरोग्य निरोगी ठेवावे. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅकचे प्रमुख कारण आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्याचा परिणाम शरीराच्या रक्तप्रवाहावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – iStock)
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. बर्गर, पिझ्झा, समोसे, मैद्याचे पदार्थ, व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी वारंवार चक्कर येऊ लागते. उठताना किंवा बसताना येणाऱ्या चक्करकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उचार करावे. यामुळे जीवघेण्या आजारापासून शरीराचे रक्षण होईल. हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे किंवा हृदयाच्या प्रक्तप्रवाहात अडथळे आल्यामुळे सतत चक्कर येऊ लागते.
बऱ्याचदा कोणत्याही कारणांशिवाय पायांच्या टाचांना आलेली सूज आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. हृदय ताकदीने रक्त पंप करणे थांबू लागते तेव्हा पायांच्या टाचांना सूज येणे किंवा पायांना सूज येणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. पायांमध्ये जडपणा जाणवणे, बुटं घट्ट होणे किंवा टाचांवर प्रेशर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक व्यक्तीला थोडं काम केल्यानंतर सुद्धा लगेच थकवा जाणवू लागतो. मात्र सतत लागलेला थकवा आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयात व्यवथित न पोहचल्यामुळे शरीरातील पेशींना ऊर्जा कमी मिळते ज्यामुळे शरीरात सतत थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. हृदयाच्या कमजोरीमुळे स्नायूंमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ लागते.