शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल हा गंभीर आजार असून सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे. मात्र खराब कोलेस्ट्रॉलची शरीरात वाढ झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळया रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. हा थर आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लक्षणे दिसून न आल्यामुळे आरोग्य हळूहळू बिघडू लागते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीराच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर कोणत्या समस्या उद्भवतात? यावर कोणते उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यातील पहिले लक्षण म्हणजे डोकं दुखणे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डोकं दुखण्यास सुरुवात होते.यामुळे अर्ध किंवा पूर्ण डोकं दुखतं. तसेच या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हळूहळू डोळ्यांचा रंग बदलू लागतो.डोळ्यांखाली पांढऱ्या रंगाचे डाग येऊ लागतात. त्यामुळे अशी कोणतेही लक्षणे दिसल्यास तातडीनेडॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर छातीमध्ये दुखू लागते. छातीमध्ये दुखणे किंवा छातीवर दाब आल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून योग्य ती काळजी घ्यावी.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे चुकीची जीवनशैली न जगता खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावे. जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण नियंत्रणात आणावे. शिवाय रोजच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. फायबरयुक्त पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. वाढलेले वजन नियंत्रणात आणावे, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा नियंत्रणात राहिल.