Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

Curdled Milk Benefits : घरात दूध फाटलं की आपण पनीर काढतो आणि उरलेलं पाणी सरळ फेकून देतो. पण हेच पाणी पोषक तत्त्वांनी भरलेलं असून स्वयंपाकघरापासून बागकाम आणि ब्युटी केअरपर्यंत अनेक कामी येऊ शकतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2026 | 08:15 PM
तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं.... जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं.... जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

Follow Us
Follow Us:
  • फाटलेल्या दुधाचं हे पाणी जेवणातील विविध पदार्थांमध्ये वापरता येऊ शकते आणि त्यामुळे चव अधिक खुलू शकते.
  • घरगुती कामांपासून झाडांच्या निगेसाठीही ते उपयुक्त ठरू शकते.
  • योग्य काळजी घेतल्यास चेहरा आणि केसांसाठीही याचा फायदा होऊ शकतो.
दूध हा स्वयंपाकघरात वापरला जाणारा महत्त्वाचा पदार्थ आहे. दूधापासून अनेक पदार्थ बनवले जातात. काहींच्या तर सकाळची सुरुवात दुधाच्या सेवनाने होते. चहा-काॅफीमध्ये दुधाचा वापर केला जातो. अशात आपल्या घरात दुधाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हटल्यास वावंग ठरणार नाही. आता रोजच्या वापरातील हे दूध आपण गरम करुन मग त्याचा वापर करतो आणि ते खराब होऊ नये म्हणून त्याला फ्रिजमध्ये ठेवतो, पण बऱ्याचदा दुध गरम करायचे राहून गेले किंवा त्याला फ्रिजमध्ये ठेवायला जर आपण विसरले आणि फार काळ ते बाहेरील गरम वातावरणात राहिल्यास ते फाटते. दुधाचं फाटणं फार सामान्य गोष्ट आहे.

Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

बहुतेक घरांमध्ये दुध फाटल्यानंतर त्यातील पाणी वेगळं करुन फाटलेल्या दुधातून निघालेल्या मलाईपासून पनीर तयार केलं जातं आणि यातून उरलेलं पाणी मात्र फेकून दिलं जातं. तुम्हीही फाटलेल्या दुधातून निघणाऱ्या पाण्याला जर फेकून देत असाल तर वेळीच ही चूक सुधारा. अनेकांना ठाऊक नाही पण हे पाणी खरंतर आपल्या बऱ्याच कामी येऊ शकते. त्यात कॅल्शियम, प्रथिने आणि खनिजे असतात, ज्यामुळे ते उपयुक्त ठरते. चला या पाण्याचा कसा वापर करायचा ते जाणून घेऊया.

पीठात टाका

रोजच्या जेवणात केल्या जाणाऱ्या चपात्यांच्या पीठात तुम्ही दुधाचे हे पाणी टाकू शकता. पीठ मळताना त्यात हे पाणी टाकल्याने चपातीची चव आणखी छान लागते.

भाज्या आणि डाळींची चव वाढवते

हे पाणी भाज्या किंवा डाळीमध्ये घातल्याने थोडासा आंबटपणा येतो, ज्यामुळे चव सुधारते. हे विशेषतः रस्सा, सांभार किंवा चटण्यांमध्ये वापरले जाऊ शकते.

वनस्पतींसाठी नैसर्गिक खत

फाटलेल्या दूधाचे पाणी हे वनस्पतींसाठी एक चांगले नैसर्गिक खत ठरते. ते पाण्याने थोडेसे पातळ करा आणि वनस्पतींच्या मुळांना लावा. यामुळे मातीचे पोषण होते आणि वनस्पतींची वाढ होते.

स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी वापर

या पाण्यातील सौम्य आम्लयुक्त गुणधर्म भांडी आणि स्वयंपाकघरातील चुली स्वच्छ करण्यास मदत करतात. पितळ किंवा तांब्याच्या भांड्यांची चमक वाढवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

फाटलेल्या दूधाचे पाणी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचा स्वच्छ आणि मऊ वाटते. ते केसांना लावल्याने कोरडेपणा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक येऊ लागते.

चेहऱ्यावर कायमच टिकून राहील तारुण्य! संत्र्याच्या सालींपासून घरीच तयार करा आयुर्वेदिक साबण, त्वचा होईल उजळदार

आवश्यक खबरदारी

  • फाटलेल्या दुधाचे पाणी जास्त जुने नसावे.
  • जर त्याचा वास वाईट असेल तर वापरू नका.
  • त्वचेवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

Web Title: How to use leftover water from curdled milk lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • milk

संबंधित बातम्या

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
1

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
2

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
3

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.