
पिवळ्या दातांमुळे हसताना लाजिरवण्यासारखे वाटते? मग स्वयंपाकघरातील पदार्थांचा वापर करून बनवा हर्बल आयुर्वेदिक टूथपेस्ट
Teeth Care: दात स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसभरात दोन वेळा ब्रश, माऊथ वॉशचा वापर केला जातो. नियमित सकाळी उठल्यानंतर टूथपेस्टने दात घासून स्वच्छ केले जातात. पण बऱ्याचदा दात कितीही घासले किंवा वेगवेगळ्या टूथपेस्टचा वापर केल्यानंतर सुद्धा दातांवरील पिवळा थर कमी होत नाही. दातांवर जमा झालेला पिवळा थर वाढल्यानंतर तोंडातून दुर्गंधी, दातांमधून रक्त येणे तर काहीवेळा हिरड्यांना सूज सुद्धा येते. दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे चारचौघांमध्ये गेल्यानंतर लाजिरवण्यासारखे वाटते. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. आजकाल बाजारात केमिकल्सयुक्त टूथपेस्ट खूप जास्त आहेत. वारंवार केमिकल टूथपेस्टचा वापर करण्याऐवजी या आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून बनवलेली टूथपेस्ट वापरावी. यामुळे दात स्वच्छ होतात आणि दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
कडुलिंब पावडर
लवंग पावडर
ज्येष्ठमध पावडर
त्रिफळा पावडर
हळद
दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टूथपेस्ट बनवावी. यासाठी मोठ्या वाटीमध्ये कडुलिंब पावडर, लवंग पावडर, ज्येष्ठमध पावडर, त्रिफळा पावडर घालून एकत्र मिक्स करा. तयार केलेले मिश्रणात चिमूटभर हळद घालून मिक्स करा. तयार केलेली पावडर हवा बंद डब्यात भरून ठेवा. जेणेकरून लवकर खराब होणार नाही. सकाळी दात स्वच्छ करताना नियमित तयार केलेल्या आयुर्वेदिक पावडरचा वापर करावा. यामुळे दात स्वच्छ होतात आणि दातांवरील चमक वाढते.
दातांवर लावण्यासाठी कोरडी पावडर नको असल्यास तयार केलेल्या मिश्रणात थोडस खोबरेल तेल मिक्स करून पेस्ट बनवा. या पेस्टचा वापर करून दात स्वच्छ करावे. दातांच्या आरोग्यासाठी कडुलिंब, लवंग आणि हळद खूप जास्त फायदेशीर ठरतात. लिंबू, मीठ, राख किंवा खरबरीत पावडरने दात घासल्यानंतर दातांवरील इनेमल खराब होऊन जाते आणि दात निस्तेज होतात.
health care: दैनंदिन जीवनातील सवयी बदला,’या’ आजारांपासून राहा दूर
दातांच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष देणे फार आवश्यक आहे. दिवसाभरातुन दोनदा दात स्वच्छ करण्यासाठी फ्लोराइडयुक्त टूथपेस्टचा वापर करावा. या टूथपेस्टच्या वापरामुळे दात स्वच्छ होतात आणि हिरड्यांना कोणतीही हानी पोहचत नाही. दात दुखणे, हिरड्यांतून रक्त येणे किंवा दातांवरील पिवळेपणा कायम टिकून राहिल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Ans: चहा-कॉफीचे अतिसेवन, तंबाखूचे सेवन, दातांची योग्य स्वच्छता न राखणे आणि काही औषधांचा परिणाम यामुळे दात पिवळे पडू शकतात.
Ans: काही नैसर्गिक घटकांचा वापर करून घरगुती टूथपेस्ट तयार करता येते. मात्र, कोणतेही मिश्रण वापरण्यापूर्वी त्याची दातांच्या इनॅमलवरील सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे आहे.
Ans: काही हर्बल घटक तोंडाच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त असू शकतात. मात्र, दातांवरील खोलवरचे डाग किंवा अंतर्गत पिवळेपणा दूर करण्यासाठी केवळ घरगुती उपाय पुरेसे नसतात.