Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss साठी पित असाल अ‍ॅप्पल साईडर व्हिनेगर, पिवळे होतील दात; असे करा सेवन

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर निश्चितच फायदेशीर आहे, परंतु योग्य पद्धतीने सेवन करणे खूप महत्वाचे आहे. योग्य प्रमाणात आणि पद्धतीने वापरल्याने त्याचे फायदे मिळवू शकता आणि दातदेखील सुरक्षित ठेवू शकता

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 08, 2025 | 10:26 AM
अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा दातांवर काय होतो परिणाम (फोटो सौजन्य - Snappa)

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा दातांवर काय होतो परिणाम (फोटो सौजन्य - Snappa)

Follow Us
Close
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी बरेच लोक दररोज अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (ACV) वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का की चुकीच्या पद्धतीने वापरल्याने तुमच्या दातांना गंभीर नुकसान होऊ शकते? 

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड इतके शक्तिशाली आहे की जर ते थेट सेवन केले तर ते हळूहळू दातांच्या मुलामा चढवणे नष्ट करू शकते, ज्यामुळे दात संवेदनशील आणि कमकुवत होतात. यासाठी नक्की कशा पद्धतीने तुम्ही अ‍ॅपल सायडर व्हिनेगर प्यावे हे आपण जाणून घेऊया. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने दिलेल्या अहवालानुसार याचा दातावर कसा दुष्परिणाम होतो ते आपण या लेखात सांगत आहोत. जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन करत असाल तर खाली दिलेल्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचे दात सुरक्षित ठेवू शकता. (फोटो सौजन्य – Snappa) 

१. नेहमी पाण्यात मिसळा

कधीही अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थेट पिऊ नका. एक ग्लास कोमट किंवा सामान्य पाण्यात १-२ चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि ते प्या. यामुळे दातांवर त्याचा आम्लीय परिणाम होणार नाही आणि दात पिवळे पडणार नाहीत. तसंच अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वेट लॉससाठी पिण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतः त्याचा डायरेक्ट वापर करू नका

दात पिवळे पडत चाललेत? घरगुती उपाय करून पहा, मोत्यासारखे चमकतील दात

२. स्ट्रॉ वापरा

जर तुम्ही अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे पाणी स्ट्रॉ मधून प्यायले तर ते थेट दातांच्या संपर्कात येणार नाही आणि इनॅमलला नुकसान होणार नाही. यामुळेच कोणतेही सोडायुक्त पेयसुद्धा स्ट्रॉ ने पिण्याचा सल्ला देण्यात येतो. दातांवर डायरेक्ट याचा परिणाम होतो. स्ट्रॉ ने पिण्यामुळे दाताला त्रास होत नाही 

३. चूळ भरा  

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पिऊन झाल्यानंतर लगेच साध्या पाण्याने तुम्ही चूळ भरा, जेणेकरून आम्ल जास्त काळ दातांवर राहणार नाही. परंतु ब्रश करण्यासाठी ३० मिनिटे वाट पहा कारण आम्ल सेवन केल्यानंतर लगेच ब्रश केल्याने इनॅमल आणखी खराब होऊ शकते. यामुळे सर्वात आधी चूळ भरा आणि मग अर्ध्या तासाने तुमचे दात घासा म्हणजे दातांवर पिवळा थर जमणार नाही आणि दात खराब होणार नाहीत 

४. माफक प्रमाणात सेवन करा

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मर्यादित प्रमाणात सेवन करा. दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा ते घेऊ नका आणि जर तुम्हाला आधीच पोट किंवा दातांची समस्या असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच स्वतःच्या मनाने अजिबात याचे सेवन करू नका आणि केवळ 1 चमचा सेवन करणे योग्य ठरते 

दातांवरील पिवळ्या थरामुळे हसणं होतंय कठीण? सोपा घरगुती उपाय चमकवेल दात हिऱ्यासारखे

५. दर आठवड्याला ब्रेक घ्या

दररोज अ‍ॅपल सायडर व्हिनेगर सतत घेतल्याने दातांवरही परिणाम होऊ शकतो. आठवड्यातून १-२ दिवसांचा ब्रेक घ्या जेणेकरून दात बरे होण्यास वेळ मिळेल. तसंच तुम्ही डॉक्टरला विचारल्याशिवाय अजिबात याचे सेवन करू नका, अन्यथा वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही शरीराला अधिक त्रास देऊ शकता हे लक्षात घ्या 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Teeth may get damaged due to apple cider vinegar using for weight loss how to drink for safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • Health Tips
  • teeth problems
  • Weight loss

संबंधित बातम्या

Health Tips: डासांना प्रतिबंधक करणारी केमिकल अगरबत्ती पालकांनी का टाळावी, बाळांवर काय होतो परिणाम
1

Health Tips: डासांना प्रतिबंधक करणारी केमिकल अगरबत्ती पालकांनी का टाळावी, बाळांवर काय होतो परिणाम

Navratri: नवरात्रीत घटवू शकता 5 किलो वजन, तळलेल्या पदार्थांपेक्षा फॉलो करा ‘हा’ Meal Plan, चरबी वितळेल क्षणात
2

Navratri: नवरात्रीत घटवू शकता 5 किलो वजन, तळलेल्या पदार्थांपेक्षा फॉलो करा ‘हा’ Meal Plan, चरबी वितळेल क्षणात

1 दिवसात किती Beer पिऊ शकता, लिव्हरच्या डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
3

1 दिवसात किती Beer पिऊ शकता, लिव्हरच्या डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

तुम्ही सुद्धा ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिता? तरुणांनो ‘हा’ महत्वाचा अवयव देईल धोका
4

तुम्ही सुद्धा ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिता? तरुणांनो ‘हा’ महत्वाचा अवयव देईल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.