Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात Cheapest Country, इथे भारतातील गरीब व्यक्तीही बनेल करोडपती; देशापासून किती लांब आहे ते जाणून घ्या

कमी बजेटमध्ये परदेशात फिरायचे असेल तर लाओस हा उत्तम पर्याय आहे. स्वस्त राहणीमान, कमी खर्चात अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज आणि निसर्गसौंदर्यामुळे हा देश पर्यटकांना आकर्षित करतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 13, 2026 | 08:32 AM
जगातील सर्वात Cheapest Country, इथे भारतातील गरीब व्यक्तीही बनेल करोडपती; देशापासून किती लांब आहे ते जाणून घ्या

जगातील सर्वात Cheapest Country, इथे भारतातील गरीब व्यक्तीही बनेल करोडपती; देशापासून किती लांब आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • परदेश फिरण्याची इच्छा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक योग्य पर्याय आहे.
  • इथे तुम्ही कमी खर्चात पर्यटनाचा आनंद लुटू शकता.
  • चला हा कोणता देश आहे आणि इथे कस जायचं ते जाणून घेऊया.
आजकाल अनेकांना परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते, पण जास्त खर्चामुळे अनेकजण आपला प्लॅन पुढे ढकलतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की जगात असे काही देश आहेत जिथे खूप कमी खर्चात सुंदर पर्यटनाचा अनुभव घेता येतो? आशियातील काही देश पर्यटकांसाठी अतिशय बजेट-फ्रेंडली मानले जातात. निसर्गसौंदर्य, शांत वातावरण, वेगळी संस्कृती आणि कमी खर्च यामुळे हे देश प्रवाशांचे आवडते ठिकाण बनत आहेत.

चारधाम यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं कराव? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अशाच देशांपैकी एक म्हणजे लाओस. 2025-2026 च्या प्रवासाशी संबंधित आकडेवारीनुसार हा देश जगातील सर्वात स्वस्त पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. दक्षिण-पूर्व आशियामध्ये वसलेला हा देश अतिशय सुंदर, शांत आणि निसर्गरम्य आहे. येथे राहण्याचा खर्च, खाणे-पिणे आणि प्रवास यावर फारच कमी पैसे खर्च होतात. त्यामुळे भारतासह जगभरातील पर्यटक कमी बजेटमध्ये परदेश प्रवासाचा आनंद घेण्यासाठी लाओसला पसंती देत आहेत.

भारतापासून लाओस किती दूर?

भारतापासून लाओसची हवाई अंतर साधारण 2,400 ते 2,700 किलोमीटर इतके आहे. जर तुम्ही नवी दिल्लीहून लाओसची राजधानी Vientiane येथे जाणार असाल, तर विमानाने पोहोचण्यासाठी साधारण 9 ते 11 तास लागू शकतात. बहुतांश फ्लाइट्स Bangkok किंवा इतर शहरांमधून कनेक्टिंग असतात. वियनतियान हे लाओसचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शहर मानले जाते.

भारतीयांसाठी बजेट-फ्रेंडली ठिकाण

लाओसची अधिकृत चलन Lao Kip आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत ही चलन खूपच कमी मूल्याची आहे. साधारणपणे 1000 लाओ कीप हे भारतीय 4 ते 5 रुपयांच्या आसपास असतात. त्यामुळे भारतीय पर्यटकांसाठी येथे फिरणे, खाणे-पिणे आणि राहणे हे खूपच स्वस्त पडते.
याच कारणामुळे कमी बजेटमध्ये परदेशात फिरायचे असल्यास लाओस हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

स्वस्तात मिळणारे अ‍ॅडव्हेंचर अनुभव

  • अलीकडेच एका ट्रॅव्हल व्लॉगरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून लाओस किती बजेट-फ्रेंडली आहे हे दाखवून दिले. त्या व्हिडिओनुसार येथे अनेक अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज अगदी कमी पैशात करता येतात.
  • सुमारे 200 रुपयांत सुंदर धबधबे पाहता येतात.
  • झिपलाइन सुमारे 1000 रुपयांत करता येते.
  • हॉट एअर बलून राईड सुमारे 5000 रुपयांत उपलब्ध असते.
  • पॅरामोटरिंग सुमारे 3000 रुपयांत करता येते.
  • शहरात फिरण्यासाठी 300 रुपयांत स्कूटर भाड्याने मिळू शकते.
  • ट्रेनने प्रवास करायचा असल्यास 1000 रुपयांच्या आसपास खर्च येतो.
  • इतक्या कमी खर्चात एवढ्या गोष्टी अनुभवता येतात, म्हणूनच अनेक ट्रॅव्हल प्रेमी लाओसला पसंती देतात.
लाओसची भौगोलिक माहिती

भौगोलिकदृष्ट्या Laos हा देश पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे. याला समुद्रकिनारा नाही. हा देश China, Vietnam, Cambodia, Thailand आणि Myanmar या देशांच्या सीमांनी वेढलेला आहे.
या देशाच्या पश्चिम भागातून वाहणारी Mekong River ही नदी लाओसची जीवनरेखा मानली जाते. शेती, पाणीपुरवठा आणि स्थानिक लोकांचे दैनंदिन जीवन या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

देशातील 8 अद्भुत मंदिर जिथे प्रसादात दिला जातो डोसा, चायनिज आणि उंदराचं उष्ट अन्न

इतिहास आणि संस्कृती

इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर लाओस हा देश 1893 ते 1953 या काळात France च्या वसाहतीखाली होता. त्यानंतर या देशाने स्वातंत्र्य मिळवले. आज येथे मोठ्या प्रमाणात लोक Buddhism धर्माचे पालन करतात.

लाओसमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. येथे हिरवेगार डोंगर, भव्य धबधबे, प्राचीन बौद्ध मंदिरे आणि शांत निसर्ग पाहायला मिळतो. याशिवाय ट्रेकिंग, बोटिंग, झिपलाइन, बलून राईड यांसारख्या अनेक अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीजही पर्यटकांना अनुभवता येतात. कमी खर्च, सुंदर निसर्ग आणि वेगळा सांस्कृतिक अनुभव यामुळे लाओस हा देश बजेटमध्ये परदेशात फिरण्याचा विचार करणाऱ्या प्रवाशांसाठी खरोखरच एक आकर्षक पर्यटनस्थळ ठरत आहे.

Web Title: The cheapest country in the world here even the poorest person of india will become a millionaire travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • country
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
1

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
2

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
3

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
4

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.