नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! नियमित आहारात करा 'या' १० रुपयांच्या पदार्थाचे सेवन
जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारत सतत होणारे बदल, तेलकट तिखट पदार्थांचे अतिसेवन, कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे जेवणात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहते. यामुळे हार्ट अटॅक,स्ट्रोक किंवा हृद्यासंबंधित इतरही समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. कोलेस्ट्रॉल शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकते.(फोटो सौजन्य – istock)
रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीराला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. तसेच शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डोळ्यांभोवती पिवळा थर साचून राहतो. त्यामुळे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतो. याशिवाय आलं अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इन्फ्लेमेटरी घटक शरीरातील रक्त शुद्ध करतात. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले घाणरेडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आल्याच्या चहाचे उपाशी पोटी सेवन करावे. उपाशी पोटी सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. तसेच रक्तवाहिन्यांमधून साचून राहिलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी आलं खावं.
कोलेस्टरॉलमुळे शरीरात साचून राहिलेला चिकट पिवळा थर कमी करण्यासाठी आणि ब्लॉकेज कमी करण्यासाठी आलं खावं. यामुळे स्ट्रोक, हार्ट अटॅक यांसारखे आजार उद्भवणार नाही. आल्यामध्ये असलेले ‘जिंजेरॉल’ आणि इतर जैवसक्रिय घटक शरीरात साचलेली घाण स्वच्छ करतात. रक्तयवाहिन्यांमध्ये साचलेला चिकट थर कमी करून हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवत नाही.
गॅस झाल्यावर नाभीमध्ये लावा तेल, Navel Oiling चा शरीरावर कसा पडतो फरक
सकाळी उठल्यानंतर आल्याचा चहा किंवा आल्याचा रस प्यायल्यामुळे अपचनाची समस्या उद्भवत नाही. तसेच शरीरात साचून राहिलेले पित्त आणि ऍसिडिटी कमी होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आलं प्रभावी आहे. यामुळे पोट आणि संपूर्ण शरीर स्वच्छ होते. आल्याचे पाणी नियमित प्यायल्यास रक्तवाहिन्यांमधील घाण स्वच्छ होईल आणि आतड्यांमध्ये वाढलेली सूज कमी होण्यास मदत होईल.