डोळ्यांच्या पेशींवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी नियमित डोळ्यांभोवती लावा 'हा' पिवळा पदार्थ
बदलत्या काळात सर्वच गोष्टी डिजिटल झाल्यामुळे मोबाईल, लॅपटॉप आणि कम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सतत मोबाईल, लॅपटॉपवर काम करत राहिल्यामुळे मानसिक आरोग्यासोबतच शरीरालासुद्धा हानी पोहचू लागली आहे. तासनतास एका जागेवर बसून राहिल्यामुळे कंबर दुखणे, पाठीमध्ये वाढलेल्या वेदना आणि शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे डोळ्यांना विश्रांती देणे आवश्यक आहे. हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मोबाईलचे खूप जास्त वेड आहे. यामुळे डोळे कोरडे होणे, डोळ्यांमध्ये सतत वेदना होणे, डोळे लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ लागतात.(फोटो सौजन्य – istock)
डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी डोळ्यांखाली क्रीम लावली जाते तर कधी डोळ्यांवर काकडी ठेवली जाते. यामुळे डोळ्यांना काहीवेळा पुरता थंडावा मिळतो. मात्र पुन्हा एकदा डोळे लाल होण्यास सुरुवात होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी आणि डोळे चमकदार करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.हे घरगुती उपाय केल्यास डोळ्यांसंबंधित समस्या दूर होतील.
डोळ्यांसंबंधित वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी आणि डोळ्यांखालील त्वचा सुधारण्यासाठी डोळ्यांना तूप लावावे. तूप लावल्यामुळे डोळ्यांनाखाली त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसेल. आयुर्वेदामध्ये तुपाला विशेष महत्व आहे. रात्री झोपण्याआधी डोळ्यांच्या कडांना काजळाप्रमाणे तूप लावावे. यामुळे डोळे थंड राहतात. हा उपाय नियमित केल्यास डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी होतो. डोळे चमकदार होतात, डोळ्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. डोळ्यांभोवती नियमित तूप लावल्यामुळे डोळ्यांच्या मसल्स रिलॅक्स होतात. तासनतास मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहून कमी झालेली दृष्टी सुधारण्यासाठी तुपाचा वापर करावा.
तुपामध्ये असलेले गुणधर्म डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.यामुळे डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होतात. याशिवाय शरीरात वाढलेला तणाव आणि थकवा कमी होतो. यासाठी हातांच्या बोटांवर तूप घेऊन हलक्या हाताने डोळ्यांखाली मसाज केल्यास डोळ्यांना विश्रांती मिळते. डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी तुपाने मसाज करणे अतिशय प्रभावी ठरेल. हा उपाय दिवसभरातून दोन किंवा तीन वेळा केल्यास लगेच फायदे दिसून येतील.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही वेळ सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाकडे पाहत राहणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. यामुळे व्हिज्युअल मोटर कोऑर्डिनेशन सुधारते आणि डोळ्यांच्या पेशींवर आलेले ताण कमी होण्यास मदत होते. पण दुपारच्या प्रखर उन्हात अजिबात पाहू नये. यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.