नाभीत तेल लावण्याचे फायदे (फोटो सौजन्य - iStock)
नाभी हे शरीराचे एक शक्तिशाली केंद्र मानले जाते. आयुर्वेदात, नाभीला शरीरातील ७२,००० नसा जोडणारा बिंदू मानला जातो. यासोबतच, आयुर्वेदात नाभीमध्ये तेल लावण्याची पद्धतदेखील आहे. माहितीनुसार, आयुर्वेदात नाभीमध्ये तेल लावणे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे अनेक आजार टाळता येतात.
नाभीमध्ये तेल लावण्याला ‘नाभी पुराण’ किंवा ‘पेचोटी विधी’ म्हणतात. नाभीमध्ये तेल लावणे हा एक नैसर्गिक उपाय आहे, ज्यामुळे अनेक आजारांपासून मुक्तता मिळू शकते. विशेषतः ज्या व्यक्तींना गॅससंबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी पोटाच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी नाभीमध्ये कोणते तेल लावावे हे सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
नाभीत कोणते तेल लावावे
नाभी हा असा बिंदू आहे जिथे तेल लावल्याने संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः बद्धकोष्ठता, गॅस सारख्या पोटाशी संबंधित समस्यांमध्ये ते खूप प्रभावी मानले जाते. याबद्दल बोलताना प्रसिद्ध आयुर्वेदिक पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना त्यांनी नाभीमध्ये कोणते तेल लावावे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगितले आहेत, जाणून घ्या
पोटाशी संबंधित समस्या
पोटाच्या समस्या असल्यास नाभीत तेलाचा वापर करावा
पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांमध्ये नाभीमध्ये तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही नाभीमध्ये एरंडेल तेल लावू शकता. हे तेल नैसर्गिकरित्या पचनसंस्थेला सक्रिय करते, ज्यामुळे सर्व समस्या टाळता येतात आणि नियमित याचा वापर केल्याने गॅससारख्या समस्या टाळण्यास मदत मिळते
गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, पोट होईल स्वच्छ
हार्मोनल संतुलन
हार्मोनल असंतुलनाच्या बाबतीतही नाभीमध्ये तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत, पोषणतज्ज्ञ नाभीमध्ये तीळ पेस्ट लावण्याची शिफारस करतात. विशेषतः महिलांना मासिक पाळीच्या वेळी हे तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. तिळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही ही समस्या सोडवू शकता असा सल्ला यावेळी डॉक्टरांनी दिली आहे.
मुरूमांवर उपयुक्त
मुरूमांची समस्या दूर करण्यासाठी वापरा
चेहऱ्यावर मुरुमं येत असतील तरीही नाभीमध्ये तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत नाभीमध्ये कडुलिंबाचे तेल लावावे. कडुलिंबाचे तेल हे आयुर्वेदात उत्तम मानले जाते आणि याचा वापर केल्याने त्वचेला अधिक चांगला फायदा होतो. त्यामुळे तुम्हाला त्वचेवरून पुरुळ, मुरूमांचा त्रास नाहीसा करायचा असेल तर नाभीत कडुलिंबाच्या तेलाचा वापर करावा.
कोरडी त्वचा
कोरड्या त्वचेसाठी नाभीत तेल लावावे
अनेक लोकांची त्वचा खूप कोरडी असते. कोरडी आणि निर्जीव त्वचा टाळण्यासाठी नाभीमध्ये नारळाचे तेल लावावे. ते तुमच्या कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करते. यासोबतच, चेहऱ्यावर चमक आणि मऊपणा येण्यासाठी नाभीमध्ये बदाम तेल लावावे. बदाम तेल हे उपयुक्त असून त्याचा योग्य वापर केल्यास कोरड्या त्वचेची समस्या निघून जाण्यास मदत मिळते.
सकाळी उठताच पोटात होतोय गॅस, 4 घरगुती उपायांनी होईल छुमंतर
सांधेदुखी
सांधेदुखीसाठी घरगुती उपाय
वयानुसार सांधेदुखीची समस्या सामान्य होते. सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी नाभीमध्ये मोहरीचे तेल लावावे. मोहरीचे तेल हे खाण्यासाठीही वापरण्यात येते मात्र त्याचा उपयोग तुम्ही सांधेदुखी घालविण्यासाठीही करू शकता. मोहरीच्या तेलामध्ये प्रथिने, विटामिन ई, ओमेगा – ३, ओमेगा – ६, अँटीऑक्सिडंट्स, लोह, कॅल्शियम आणि सेलेनियमचा समावेश आहे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.