
फोटो सौजन्य - Social Media
माणसाला आता अशक्य असे काहीच राहिले नाही आहे, देवाच्या शोधात माणूस स्वतः देव बनत चालला आहे. माणसाने चंद्र पाहिले, मंगल पाहिले. पण पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे राहण्यासाठी माणूस तयार होत नाही अगदी नाव ऐकलं तरी थरथर कापतो. का त्या जागा अशा भयंकर आहेत? जाणून घेऊयात.
मंगळावर पोहचलेला माणूस ऍमेझॉनच्या जंगलात टिकू शकणार नाही. कारण येथे पावलापावलावर मृत्यू आहे. हे दाट जंगल क्षणोक्षणी तुमच्या जीवाची परीक्षा घेते. येथे अनेक विषारी किटके आहेत, विषारी साप आहेत, जे पावलापावला तुमच्या जीवाची वाट पाहत असतात. येथे काही मोजक्या प्रजाती राहतात पण त्यांचे जीवन हे पाषाणकाळी आहे. त्यामुळे आपण ‘फॅशनकाळी’ माणसं अमेझॉनच्या या विस्तृत खोऱ्यात जगू शकत नाही.
अमेझॉनसारखेच प्रसिद्द वृक्षवन म्हणजे डेरिअन गॅप! डेरिअन गॅप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान १०० किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या जंगलामुळे ‘पॅन अमेरिकन’ सारखा ३०००० किलोमीटर लांबीचा जगातील सगळ्यात लांबीच्या रस्त्याचे काम या १०० किमीच्या पट्ट्यामुळे थांबला आहे. येथील वातावरण इतके भयानक आहे की येथे कुणी जगूही शकत नाही. इथे राहणार माणूस एकतर नदीच्या रौद्र रूपात नाहीसा होईल किंवा ३० माजली इमारत बुडेल इतक्या खोल दलदलीत बुडून मरून जाईल. अगदी त्यातूनही वाचला तर मलेरिया किंवा काविळीने मरून जाईल, त्यामुळे इथे कुणीही राहत नाही आणि जातही नाही.
अंटार्क्टिका हा एकुलता असा खंड आहे, जिथे कुणी राहत नाही. येथील तापमान उन्हाळ्यातही उणे असतो, तर हिवाळ्यात ते 80c te 90c पर्यंत खाली जाते. इतक्या टोकाच्या थंडीत कोणताही माणूस दीर्घकाळ जिवंत राहू शकत नाही. तिथे फक्त संशोधक (Scientists) काही काळासाठी राहतात, पण त्यांचेही राहणे पूर्णपणे मशिनरी आणि बाह्य मदतीवर अवलंबून असते.
भारतातील नॉर्थ सेंटिनल बेट, तसे राहण्यासाठी उत्तम आहे पण येथे राहणारी ‘सेंटिनेलीज’ जमात त्यांच्या या बेटावर कुणालाही पाय ठेवून देत नाही त्यामुळे या जागेचे जतन करण्यासाठी आणि या पाषाणकाळी माणसांचे अस्तित्व जपण्यासाठी येथे कुणाचीही एंट्री बंद आहे.