फोटो सौजन्य - Social Media
अमेझॉन या पृथ्वीतलावरचे सगळ्यात भयंकर जागा मानली जाते. अमेझॉनचे दाट जंगल इतके मोठे आणि दाट आहे की तिथे सगळ्याच गोष्टींचे संशोधन करणे हे फार अशक्य मानले जाते. त्या दाट जंगलात असे अद्भुत रहस्य आहे, ज्याची कल्पना आपण कधीही केली नसेल. अगदी आपण अजून नावही ऐकले नसेल अशा प्रजाती त्या जंगलात राहत आहेत. त्या जंगलात काय काय आहे? याचे उत्तर शोधणे तसे कठीण पण काही रहस्यांचा उलगडा झाला आहे.
ऍमेझॉनच्या भागात शानय-तिमपिष्का नावाची नदी वाहते. ही नदी जगातील सर्वात तापत पाण्याची नदी मानू शकता कारण जवळ कोणताही ज्वालामुखी नसूनदेखील या पाण्याचे तापमान ९०c आहे. या पाण्यात पडलेला पक्षीही अवघ्या पाहताच क्षणी भाजून निघतो. पाणी इतके गरम कसे? याचे उत्तर अद्याप सापडले नाही. अमेझॉनचे जंगल मानवाला राहण्यासाठी योग्य नाही. पण काही संशोधकांना या दाट जंगलांच्या आत रस्ते, कालवे तसेच पिरॅमिड्सची भव्य शहरे गाडली गेल्याची किणकिण आहे. शक्यता नाकारता येत नाही. कदाचित ही शहरे माया संस्कृतीप्रमाणे प्रगत असावीत!
अमेझॉनच्या जंगलात असे किटके आहेत, प्राणी आहेत, ज्यांचा शोध कदाचित आपण केलेलाच नसावा कारण येथे दर ३ दिवसांनी एक वेगळी प्रजाती सापडते. या दाट जंगलातील ८०% भुव्यवस्था आपल्या ओळखीत नाही. या दाट जंगलात असणाऱ्या एका वनस्पतीमध्ये इतकी शक्ती आहे की त्याने हमखास कर्करोगाचे निदान होईल, त्या वनस्पतीचा शोध सुरु आहे.
अॅमेझॉनचे जंगल हे केवळ झाडे नाहीत, तर तो एक जिवंत इतिहास आहे जो स्वतःमध्ये हजारो वर्षांची रहस्ये दडवून बसला आहे. येथे ५० ते १०० काही प्रजाती आहेत, ज्या जगापासून विलुप्त आहेत. त्यांचा बाहेरील समाजाशी काहीच घेणंदेणं नाही, कदाचित त्यांना माहीतच नसावे की त्या जंगलाच्या बाहेरही जग आहे. ते त्या बाहेरच्या जगाशी मिळवून घेण्याची इच्छा त्यांची नाही. त्या जमातीचा Video सध्या सोशल मीडियावर तुफान करत आहे.
NEW: Never-before-seen footage of an uncontacted Amazonian tribe has been released by author Paul Rosolie on Lex Fridman’s show. The tribe was seen lowering their weapons before they were given a canoe of food. Rosolie is a conservationist who has reportedly spent two decades… pic.twitter.com/a0WF9O2Pof — Collin Rugg (@CollinRugg) January 16, 2026
जगाला २०% ऑक्सिजन देणारे आणि नऊ देशांत पसरलेले अॅमेझॉनचे जंगल आजही अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अलीकडेच चित्रपट निर्माते पॉल रोसोली यांनी या जंगलातील बाह्य जगापासून तुटलेल्या ‘माशको पिरो’ या दुर्मिळ जमातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जमातीचे योद्धे नदीकाठावर शस्त्रे घेऊन आणि अन्नासाठी केळी गोळा करताना अतिशय स्पष्टपणे दिसून आले आहेत. संशोधकांनुसार अशा २०० हून अधिक जमाती अजूनही मानवी संपर्काशिवाय पेरू आणि ब्राझीलच्या घनदाट भागात वास्तव्य करत आहेत. या जमाती बाहेरील लोकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतात, त्यामुळे त्यांचे निरीक्षण केवळ सॅटेलाईट किंवा ड्रोनद्वारे केले जाते.






