
केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत
सुंदर चमकदार केस दिसण्यासाठी आपण केसांना काहींना काही लावत असतो. शॅम्पू लावून केस स्वच्छ केल्यानंतर आपण कंडिशनरचा वापर करतो.कंडिशनर लावल्याने केस मजबूत आणि चमकदार दिसतात. पण कंडिशनर लावताना केसांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन पडत असल्याने वातावरणात अनेक बदल होत आहेत.वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या केसांवर लगेच दिसून येतो.
दमट वातावरणामुळे केस खराब होऊन जातात. पावसाळ्यातील आद्रतेचा परिणाम आपल्या केसांवर होतो. त्यामुळे केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच केस आणि त्वचेची काळजी घेतली पाहिजे. हेअर केअर रुटीन फॉलो करत असताना आपण केसांना तेल, शॅम्पू, कंडिशनर, हेअर मास्क इत्यादी अनेक उत्पादने वापरतो. या हेअर केअर रुटीनमध्ये कंडिशनरचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसतात. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केसांना कंडिशनर लावले तर तुमचे केस गळू किंवा सहज तुटू शकतात. त्यामुळे कंडिशनर लावताना केसांची कशी काळजी घेतली पाहिजे? याबद्दल आम्ही आज तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्या नक्की वापरून पाहा.(फोटो सौजन्य-istock )
केस स्वच्छ धुतल्यानंतर आपण संपूर्ण केसांना कंडिशनर लावतो. पण असे न करता फक्त केसांच्या टोकांना कंडिशनर लावावे. टाळूला कंडिशनर लावल्याने मोठ्या प्रमाणावर केस गळती सुरु होते.यामुळे केस पातळ होतात. कंडिशनर हे टाळूला न लावता फक्त केसांना लावले पाहिजे.
केसांना किंवा त्वचेला कोणतेही उत्पादने लावण्याधी ते आपल्याला सूट होतील की नाही हे पाहून मगच विकत घ्यावे. तुमच्या केसांचा प्रकार जर तेलकट किंवा अति कोरडा असेल तर केसांना कंडिशनर लावणे आवश्यक आहे. बाजारात मिळणारे केमिकल असलेले कंडिशनर वापरण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थानी बनवलेल्या कंडिशनरचा वापर करावा.
काहींना केस धुतल्यानंतर जास्त कंडिशनर वापरण्याची सवय असते. पण जास्त प्रमाणात कंडिशनर लावल्यानंतर केस खराब देखील होऊ शकतात. त्यामुळे तुमचे जेवढे केस असतील त्याचा अंदाज घेऊन केसांना कंडिशनर लावा. जास्त कंडिशनर लावल्याने केस खराब आणि निस्तेज होऊन जातात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.