
गर्भावस्थेत वाढतोय उच्च रक्तदाब धोका! 'कामा आणि ऑलब्लेस'मधील अभ्यासात करण्यात आला धक्कादायक खुलासा
उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे ?
उच्च रक्तदाबाचा सार्वधिक धोका कोणाला?
गर्भावस्थेत आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब विकार हे आजही मातृ व नवजात आजारपणाचे महत्त्वाचे कारण ठरत असल्याचे कामा अॅण्ड ऑलब्लेस रुग्णालयात करण्यात आलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. गर्भधारणेतील सुमारे ५ ते १० टक्के महिलांना हे विकार होतात आणि वेळेवर निदान व उपचार न झाल्यास गंभीर गुंतागुंत उद्भवू शकते, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. जून ते नोव्हेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या मागोवा अभ्यासात २० आठवड्यांहून अधिक गर्भावधी असलेल्या ३० गर्भवती महिलांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये गेस्टेशनल हायपरटेन्शन हा सर्वाधिक आढळणारा विकार (६३.३ टक्के) ठरला, तर प्री-एक्लॅमप्सया (१६.७ टक्के), तीव्र प्री-एक्लॅर्मप्सया सिंड्रोम व सुपरइम्पोज्ड हायपरटेन्शन (१६.७ टक्के) आणि एक्लॅर्मप्सया (३.३ टक्के) अशी प्रकरणे नोंदवली गेली. (फोटो सौजन्य – istock)
अभ्यासानुसार २५ ते ३४ वयोगटातील महिलांमध्ये या विकारांचे प्रमाण अधिक असून ४० टक्के महिला पहिल्यांदाच गर्भवती होत्या. ३५ वर्षांवरील महिलांमध्ये आजाराची तीव्रता तुलनेने अधिक दिसून आली. सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण ८६.७टक्के इतके उच्च असल्याचेही अभ्यासात आढळले.
नवजात बाळांच्या बाबतीत दिलासादायक चित्र समोर आले असून एकाही प्रकरणात मृतजन्म नोंदवला गेला नाही.३६.७ टक्के बाळांचे वजन कमी (१५००-२४९९ ग्रॅम) होते, तर १६.७ टक्के बाळांना एनआयसीयूमध्ये दाखल करावे लागले, मात्र बहुसंख्य बाळांची प्रकृती स्थिर होती. महिलांच्या आरोग्याबाबत कोणतीही मातृमृत्यू किंवा गंभीर गुंतागुंत नोंदवली गेली नाही, हे या अभ्यासाचे महत्त्वाचे निरीक्षण ठरले आहे.
(हायपरटेन्शन) टाळण्यासाठी जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल आणि नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहेत. गर्भवती महिलांनी दररोज हलका व्यायाम करावा, चालणे किंवा प्रेग्नन्सी योगासारखे व्यायाम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. आहारात सकस आणि सतुलित आहाराचा समावेश करावा, फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये यांचे सेवन वाढवावे, तसेच मानसिक ताण कमी ठेवणे अत्यंत गरजेचे असून ध्यान, श्वसनाचे व्यायाम यांचा उपयोग होऊ शकतो. नियमितपणे रक्तदाब तपासणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. अति मीठाचे सेवन टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्यावी, धूम्रपान व मद्यपान पूर्णपणे टाळावे, कारण यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो, असे डॉ तुषार पालवे, स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी सांगितले आहे.
Ans: १२०/८० mmHg पेक्षा कमी.
Ans: गर्भधारणेदरम्यान हृदयावर जास्त ताण येतो आणि प्लेसेंटाच्या विकासावर परिणाम होतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
Ans: सतत डोकेदुखी, अचानक सूज येणे