कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून शरीराचा होईल बचाव! दैनंदिन जीवनात फॉलो करा 'या' आरोग्यदायी सवयी
कॅन्सर होण्याची कारणे आणि लक्षणे?
महिलांमध्ये का वाढत आहे कॅन्सरचा धोका?
कोणत्या बदलांमुळे कॅन्सरचा धोका टाळता येतो?
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आणि गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीन सरकते. हा आजार झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. तसेच कॅन्सर झाल्यानंतर वाचण्याची शक्यता खूप कमी असते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. हा गंभीर आजार होण्यास जीवनशैलीतील चुका कारणीभूत ठरतात. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि उपचार घेणे सुद्धा कठीण होऊन जाते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच योग्य ते उपचार घ्यावेत. शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण शरीरात कर्करोग पसरतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून कायमच दूर राहण्यासाठी जीवनशैलीत कोणत्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
दैनंदिन आहारात काहींना सतत रिफाइंड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याची सवय असते. सतत फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवलेले पदार्थ खाल्ल्यास वर्षभरानंतर शरीरात कॅन्सरची लक्षणे दिसू लागतात. रिफाइंड साखर, स्टार्च आणि रिफाइंड बियांचे तेल असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो. हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात जळजळ वाढून कालांतराने पेशींच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्या आणि ताज्या अन्नपदार्थांचा समावेश करावा.
कामाच्या धावपळीमध्ये शरीराची काळजी घेण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. पण दिवसभरातील कामांमधून ५ मिनिटं वेळ काढून नैसर्गिक सूर्यप्रकाशात जाऊन बसावे. विटामिन डी शरीरासाठी वरदान आहे. कारण यामुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढण्याचा धोका कमी होऊन जातो. तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन आरोग्य सुधारते. त्यामुळे दिवसभरातील काही मिनिटं उन्हात जाऊन बसावे.
सोशल मीडियावर इंटरमिटंट फास्टिंगचा मोठा ट्रेंड आला आहे. यामुळे शरीराला कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण होत नाही. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नियमित ठरवलेल्या वेळात उपवास करणे. उपवास केल्यामुळे शरीरातील पेशी दुरुस्त होतात. याशिवाय मायटोकॉन्ड्रिया अधिक मजबूत होते. उपवास केल्यामुळे शरीरातील खराब झालेल्या पेशी बाहेर पडून जातात. उपवास करण्याची सवय शरीरासाठी फायदेशीर आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे कर्करोगासारख्या अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होऊन जातो. तसेच शरीरातील सर्वच पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळते. कॅन्सरच्या पेशी वाढू नये म्हणून दिवसभरातील ३० मिनिटं व्यायाम करणे आवश्यक आहे.
Ans: कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची असामान्य आणि अनियंत्रित वाढ.
Ans: तंबाखू, मद्यपान, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव.
Ans: शरीरावर किंवा मानेत न सुजणारी गाठ.






