लिव्हरमध्ये साचलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
लिव्हर खराब होण्याची कारणे?
लिव्हर खराब झाल्यानंतर कोणते आजार होतात?
लिव्हरमधील घाण स्वच्छ करण्यासाठी उपाय?
धावपळीचा जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम, मानसिक ताण, आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरातील प्रत्येक लहान मोठ्या अवयवांना हानी पोहचते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. खाल्लेले अन्नपदार्थ पचन करणे, शरीरातील विषारी घाण बाहेर काढणे यांसह ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण चुकीच्या जीवनशैलीमुळे लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. हॉटेलचे जेवण, स्ट्रीट फूड्स, जंक फूड, तळलेले पदार्थ किंवा खूप जास्त गरम पदार्थ खाल्ल्यामुळे लिव्हरला हानी पोहचते. लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे अनेक समस्या उद्भवतात. (फोटो सौजन्य – istock)
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लिव्हरमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहते. ज्यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर, सोरायसिस इत्यादी गंभीर आजार होऊन आरोग्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीर डिटॉक्स करून शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकतील. लिव्हर खराब झाल्यानंतर वर्षभराने शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढतात. यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यावी. महिनाभर हळदीचे पाणी प्यायल्यास लिव्हरमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. हळदीमध्ये शक्तिशाली संयुग आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे लिव्हरला आलेली सूज सुद्धा कमी होते.
लिव्हरमधील घाण स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कच्च्या लसूणच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. मधासोबत किंवा तुपात भाजलेल्या लसूण पाकळ्या चवीला सुंदर लागतात. लसूणमध्ये असलेले एन्झाईम्स लिव्हरमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकतात आणि गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करतात.
लोहयुक्त बीटचे सेवन केल्यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. यासाठी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास बीटचा रस प्यावा. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. रक्तभिसरण सुधारण्यासाठी बीटचा रस प्यायला जातो. बीटच्या रसात लिंबू मिक्स करून प्यायलास शरीर स्वच्छ होईल.
Ans: सतत थकल्यासारखे वाटणे किंवा अशक्तपणा जाणवणे.
Ans: जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ मद्यपान केल्याने यकृताच्या पेशींचे नुकसान होते, ज्यामुळे फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि सिरोसिस होऊ शकतो.
Ans: यकृतातील पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ म्हणजे यकृताचा कर्करोग हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा हा सर्वात सामान्य प्रकार आहे.






