
जपानी महिलांच्या सुंदर सिल्की केसांचे रहस्य! दैनंदिन वापरात 'या' गोष्टी फॉलो केल्यास होतील लांबलचक मजबूत केस
जपानी महिलांच्या सौंदर्याचे रहस्य?
केसांची काळजी घेण्यासाठी जपानी महिला फॉलो करतात या सोप्या टिप्स?
चमकदार, मऊमुलायम केसांसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स?
जगभरात जपानी महिला त्यांच्या सौंदर्य आणि देखणेपणासाठी प्रसिद्ध आहेत. स्त्रियांचे मऊमुलायम, लांबसडक, चमकदार व निरोगी केस पाहून सगळेच आकर्षित होतात. जपानी महिला त्यांच्या केसांची खूप जास्त काळजी घेतात.या महिला केसांची पारंपरिक पद्धतीने खूप जास्त काळजी घेतात. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या नैसर्गिक घटकांचा आणि विशिष्ट टेक्निक्सचा वापर हेअर केअरमध्ये केला जातो. योग्य हेअर केअर रुटीन फॉलो केल्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि केसांचे सौंदर्या दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहते. केसांसंबधीत समस्या वाढल्यानंतर तात्पुरते हेअर केअर करण्याऐवजी दीर्घकाळ केस चमकदार आणि सुंदर होतील असे पारंपरिक हेअर केअर रुटीन फॉलो करावे. केसांच्या मुळांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
जपानी महिला केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही महागड्या केमिकल युक्त हेअर केअरचा वापर न करता नैसर्गिक उपचार, हेअर केअर आणि स्कॅल्पच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन केसांची खूप जास्त काळजी घेतात. यामुळे त्यांचे केस मुळांपासून मजबूत आणि सुंदर होतात. आज आम्ही तुम्हाला जपानी महिलांचे हेअर केअर सिक्रेट्स आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि केस अतिशय सुंदर दिसतील.
जपानी महिला केस स्वच्छ धुवण्याआधी केसांची खूप जास्त काळजी घेतात. यामुळे केसांच्या मुळांना कोणतीही हानी पोहचत नाही. केस धुवताना महिला आठवड्यातून दोनदा सिलिकॉन मसाज ब्रशचा वापर करून टाळूवर मसाज करतात. केसांच्या मुळांवर मसाज केल्यामुळे ल्पची खोलवर स्वच्छता होते आणि रक्ताभिसरण सुधारते. मसाज करतानाच नेहमी डोक्याच्या मागच्या बाजूकडून वरच्या दिशेने आणि टाळूच्या मध्यभागी मसाज केल्यास टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि शरीराला अनेक फायदे होतील.
जपानी हेअर केअर रुटीन फॉलो करताना महिला केस धुवण्याआधी केसांना तेल लावतात आणि त्यानंतर काहीवेळाने केस स्वच्छ करतात. शॅम्पू करण्याआधी केसांना मसाज केल्यास टाळूवरील पीएच संतुलित राहतो आणि केसांच्या मुळांना अनेक फायदे होतात. यासोबतच आठवड्यातून दोनदा केस स्वच्छ पाण्याने धुतल्यास टाळू स्वच्छ राहते आणि कोणत्याही इन्फेक्शन होत नाही.
सतत डाय केल्याने होतो Breast Cancer? काय आहे सत्य? वाचा
केस धुतल्यानंतर ते कोरडे करणे अतिशय महत्वाचे आहे. जपानी महिला केस स्वच्छ धुतल्यानंतर ते लगेच हेअर ड्रायरने सुकवत नाहीत. मायक्रोफायबर टॉवेल किंवा सॉफ्ट कॉटन टी-शर्टचा वापर केसांमधील पाणी शोषून घेतले जाते. यामुळे केसांना कमी फ्रिझीनेस येतो आणि केस तुटत नाहीत. हेअर मशीनने केस सुकवण्याआधी ७० टक्के केस कॉटनच्या कपड्याने कोरडे करावेत. त्यानंतर मशीनचा वापर करावा.