थंडीत केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे? मग 'या' पद्धतीने करा कोरफडचा वापर
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसंबधित भरपूर समस्या जाणवतात. थंडी पडल्यानंतर ज्याप्रमाणे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते तसेच केस सुद्धा कोरडे होऊन टाळूवर भरपूर कोंडा होतो. टाळूवर झालेल्या कोंड्यामुळे फँगल इन्फेक्शन वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये केस व्यवस्थित स्वच्छ धुवावेत आणि केसांची काळजी घ्यावी. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे केस खूप जास्त प्रमाणात गळतात. टाळूवरील त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यानंतर सतत डोक्यात खाज येते. कोंडा कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण तरीसुद्धा केसांमधील कोंडा कमी होत नाही, याउलट खूप जास्त वाढू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टाळूवर वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी कोरफडचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कोरफड लावल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि टाळूवर जमा झालेला कोंडा कमी होतो.(फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल
पूर्वीच्या काळापासून संपूर्ण आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफड वापरल्यामुळे केस अतिशय मऊ आणि मुलायम होतात. याशिवाय केस आणि त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळते. मोठ्या टोपात पाणी गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने आणि तांदूळ घालून पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात कोरफड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. ५ मिनिटं पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पाणी गाळून घ्या. हेअर मास्क थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून केस हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर केस ४० मिनिट तसेच ठेवा.
हेअर मास्क काहीवेळ ठेवल्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. केस धुवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. तसेच केस धुवताना पाण्यात शॅम्पू मिक्स करून केसांवर लावा, आणि पाण्याने शॅम्पू पूर्णपणे धुवा. आठवड्यातून दोनदा कोरफड हेअर मास्क केसांवर लावल्यास केसांच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळेल आणि केस अतिशय चमकदार दिसतील. थंडीच्या दिवसांमध्ये केस स्वच्छ करण्यासाठी अतिशय माईल्ड शाम्पूचा वापर करावा.
कोरफड केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते. यामुळे केस अतिशय मऊ आणि चमकदार होतात. कोरफडीमध्ये असलेल्या जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते. वारंवार केस गळत असतील तर कोरफड जेलचा वापर करावा. कोरफड जेल टाळूवरील पीएच पातळी संतुलित ठेवते आणि हायड्रेट ठेवते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा केसांना कोरफड जेल लावावे.






