Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट्ट कफ क्षणार्धात पडून जाईल बाहेर! चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान, शरीरातील विषारी घाण होईल नष्ट

फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट्ट कफ बऱ्याचदा श्वसननलिकेमध्ये चिटकून राहतो. अशावेळी उपाशी पोटी सुपारीच्या पानांचे सेवन करावे. यासोबतच मध, हळद आणि आल्याच्या रसाचे सुद्धा सेवन करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 15, 2025 | 08:37 AM
फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट्ट कफ क्षणार्धात पडून जाईल बाहेर! चावून खा 'हे' १ रुपयांचे पान

फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट्ट कफ क्षणार्धात पडून जाईल बाहेर! चावून खा 'हे' १ रुपयांचे पान

Follow Us
Close
Follow Us:

फुफुसांमधील कफ नष्ट करण्यासाठी उपाय?
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्य का बिघडते?
सुपारीच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे?

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. कधी सर्दी तर कधी खोकला यांसारख्या साथीच्या आजारांची शरीराला लागण होते. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरणात वाढलेल्या गारठल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते, ज्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. हवेतील संसर्गजन्य विषाणू आणि बॅक्टेरिया शरीरावर हल्ला करतात. आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, रेफ्रिजरेटेड पाणी किंवा थंड दह्याचे सेवन केल्यामुळे छातीमध्ये कफ जमा होऊन संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी, खोकला, डोकेदुखी, नाकातून सतत पाणी येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. (फोटो सौजन्य – istock)

वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल, राहाल हेल्दी

वारंवार होणाऱ्या सर्दी, खोकल्यामुळे फुफ्फुसांमध्ये कफ जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे श्वासांचा त्रास वाढू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये जमा झालेला विषारी कफ बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

सुपारीचे पान:

आयुर्वेदामध्ये सुपारीच्या पानांना विशेष महत्व आहे. वयस्कर लोकांपासून ते अगदी तरुणांपर्यंत सगळेच सुपारीचे पान खातात. हे पान नैसर्गिकरित्या कफनाशक म्हणून ओळखले जाते. सुपारीच्या पानात दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, यामुळे फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते. याशिवाय घशात वाढलेली जळजळ. खवखव कमी करण्यासाठी सुपारीचे पान चावून खावे. याशिवाय पानांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

मध:

खोकला झाल्यानंतर प्रामुख्याने खाल्लेले जाणारे प्रभावी आयुर्वेदिक औषध म्हणजे मध. मधाचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते. याशिवाय मधात नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळतात, ज्यामुळे घशात वाढलेली जळजळ, खवखव दूर होते. रात्री झोपल्यानंतर सतत येणाऱ्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी हळद आणि मधाचे चाटण खावे.

पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? गरम पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, आतड्यांची हालचाल होईल सुलभ

ओवा आणि लवंग:

लवंग ओव्याचे सेवन केल्यामुळे घशात वाढलेली खवखव आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. यामध्ये तीव्र दाहक-विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि वेदना कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. लवंगमध्ये युजेनॉल नावाचा गुणकारी घटक आढळून येतो. फुप्फुसांमध्ये साचलेला कफ वितळवण्यासाठी लवंग तेलाचे सेवन करावे. मसाल्यांच्या सेवनामुळे छातीतील रक्तसंचय कमी करण्यासाठी आणि श्वसन प्रणाली स्वच्छ करण्यासाठी प्रभावी ठरतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कफ म्हणजे काय?

    Ans: संसर्ग झाल्यास किंवा ॲलर्जी असल्यास तो जाड आणि चिकट होतो आणि त्याचा रंग बदलतो.

  • Que: कफ बाहेर काढण्यासाठी उपाय:

    Ans: आले, लवंग, दालचिनी घातलेला हर्बल टी, सूप प्या.

  • Que: कफ थुंकावा की गिळावा?

    Ans: कफ बाहेर थुंकणे किंवा गिळणे, दोन्ही सुरक्षित आहे. मात्र, कफ जाड असल्यास थुंकल्याने बरे वाटते. निरोगी व्यक्तीसाठी कफ गिळणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

Web Title: The thick phlegm accumulated in your lungs will be expelled in an instant chew and eat this 1 rupee leaf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • Benefits of cloves
  • cold and cough home remedies
  • honey
  • winter health tips

संबंधित बातम्या

सर्दी खोकल्यामुळे हैराण झाला आहात! मग चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ शक्तिशाली पदार्थ, कफ होईल कायमचा गायब
1

सर्दी खोकल्यामुळे हैराण झाला आहात! मग चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ शक्तिशाली पदार्थ, कफ होईल कायमचा गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.