
आतड्यांमध्ये चिकटलेला विषारी मल झटक्यात बाहेर पडून जाईल बाहेर! रोज सकाळी नियमित खा 'ही' फळे
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
बद्धकोष्ठता वाढण्याची कारणे?
अपचनाच्या समस्या कशामुळे उद्भवतात?
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहेत. आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहिल्यामुळे दिवसभर पोटात जडपणा जाणवणे, ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढू लागतात. वारंवार बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले अन्नपदार्थांचे कण व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अन्ननलिकेमध्ये पित्त जमा होण्यास सुरुवात होते. आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी मल बाहेर पडून न गेल्यास बद्धकोष्ठता, उलट्या, अपचन, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या फळांचे उपाशी पोटी सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
आंबट गोड चवीची किवी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. किवीची किंमत महाग असूनही अनेक लोक रोजच्या आहारात किवीचा समावेश करतात. बद्धकोष्ठतेवर किवी फळ अतिशय प्रभावी मानले जाते. यामध्ये ‘ॲक्टिनिडिन’ नावाचे एक नैसर्गिक एन्झाइम आढळून येते, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया अतिशय जलदगतीने होते. किवीमध्ये सहज विरघळणारे फायबर असते. किवीमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील विषारी मल मऊ होतो. जुनाट बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी किवी खावी.
पेरू खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पेरूचे सेवन अतिशय आवडीने केले जाते. यामध्ये असलेले फायबर आणि विटामिन सी चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यास मदत करते. पेरूमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांची हालचाल अतिशय सुलभ होते. पेरू बियांसहित खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. नियमित पेरू खाल्ल्यास आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल.
सकाळच्या नाश्त्यात नियमित वाटीभर पपईचे सेवन करावे. पपई खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. पपईमध्ये ‘पेपेन’ नावाचे पाचक एन्झाइम, अन्नातील प्रथिनांचे पचन सुधारते. याशिवाय पपईमध्ये असलेले फायबर शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा पपईचे सेवन केले जाते. पपई खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी दिवसभरात ३ लिटर पेक्षा जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील घाण घामावाटे, लघवीवाटे आणि शौचावटे बाहेर पडून जाते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पाण्यासोबतच विटामिन सी पेय आणि ताक इत्यादी पेयांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
Ans: जेव्हा तुम्हाला नियमितपणे आणि सहजपणे शौचास होत नाही, तेव्हा त्याला बद्धकोष्ठता किंवा कब्ज म्हणतात. यात शौचास कठीण होते आणि पोटात जडपणा जाणवतो.
Ans: आहारात फायबरची (तंतुमय पदार्थ) कमतरता, जास्त चरबीयुक्त, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे.
Ans: शौचास करताना जोर लावावा लागणे किंवा वेदना होणे.