
दातांना लागलेली कीड होईल कायमची नष्ट! रामदेव बाबांनी सांगितलेला 'हा' उपाय ठरेल प्रभावी
दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
दातांना कीड लागण्याची कारणे?
दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय?
बऱ्याचदा कामाच्या धावपळीमधून आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. चेहऱ्याची ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते तशी काळजी ओरल हेल्थची घेतली जात नाही. दातांमध्ये वेदना, हिरड्यांमधून रक्त किंवा दातांमध्ये कमकुवतपणा वाढून दात पूर्णपणे खराब होऊन जातात. सतत गोड किंवा अतिचिकट, कडक पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांचे आरोग्य बिघडून जाते. याशिवाय दातांवर साचून राहिलेल्या पिवळ्या थरामुळे चारचौघांमध्ये गेल्यानंतर महिलांचा आत्मविश्स्वास काहीसा काही कमी होऊन जातो. त्यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. अनहेल्दी खाणे, जास्त जंक फूडचे सेवन करणे, गोड पदार्थ खाणं, स्मोकींग आणि चुकीच्या पद्धतीने दात स्वच्छ करणे, दातांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे दातांच्या समस्या वाढून दातांना कीड लागते.(फोटो सौजन्य – istock)
कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका, वेळीच व्हा सावध
दातांना कीड लागल्यानंतर दातांमध्ये तीव्र वेदना होतात. काहीवेळा या वेदना वाढू लागतात. दात आणि हिरड्या कमकुवत झाल्यानंतर बऱ्याचदा पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केले जाते. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांना लागलेली कीड नष्ट करण्यासाठी रामदेव बाबांनी यांनी सांगितलेले काही सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे दातांचे आरोग्य सुधारते आणि दातांच्या समस्या कमी होऊन जातात. दात मजबूत होण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे दात मजबूत आणि निरोगी राहतात.
दातांना लागलेली कीड नष्ट करण्यासाठी आघाडा वनस्पतीचा वापर करावा. या वनस्पतीला लटजीरा किंवा चिरचिटा असे सुद्धा म्हणतात. ही वनस्पती प्रामुख्याने जंगलांमध्ये आणि मोकळ्या परिसरामध्ये दिसून येते. पण आघाडा वनस्पतीची ओळख नसलेली लोक याकडे कायमच दुर्लक्ष करतात. दातदुखी, पायरीया, हिरड्यांची कमजोरी इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी या वनस्पतीचे सेवन करावे. दातांना आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी आघाडा वनस्पतीचा वापर करावा. पायरियाचा त्रास झाल्यानंतर हिरड्यांना सूज येऊन वेदना होतात. तसेच अन्नपदार्थ चावण्यासाठी सुद्धा खूप जास्त त्रास होतो. या वनस्पतीच्या वापरामुळे हिरड्यांना आलेली सूज, वेदना कमी होण्यास मदत होईल.
दातांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आघाडा वनस्पती पूर्णपणे बारीक पावडर करून घ्या. एक लिटर पाण्यात तयार केलेली पावडर उकळवण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाणी उकळून अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार केलेल्या पाण्याच्या दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा गुळण्या केल्यास दातदुखी, पायरिया, हिरड्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. तसेच तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी ही वनस्पती अतिशय प्रभावी ठरते. बाबा रामदेव यांनी सांगितलेला उपाय करून पाहिल्यास दातांच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल.
Ans: दिवसातून किमान दोनदा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा.
Ans: जास्त साखर असलेले पदार्थ आणि पेये खाणे टाळा, कारण ते दातांना नुकसान पोहोचवतात.
Ans: दातांच्या आरोग्यासोबतच हिरड्यांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.