कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका
अलीकडील अभ्यासानुसार, सौंदर्यप्रसाधनांमध्ये आढळणारे पॅराबेन्स, फ्थॅलेट्स, ट्रायक्लोसन, फॉर्मल्डिहाइड आणि बेंझीन यांसारखे केमिकल्स त्वचेवाटे शरीरात प्रवेश करतात आणि दीर्घकाळात हार्मोन्सचे संतुलन बिघडवून स्तन, त्वचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. मस्कारा आणि आयलाइनरमध्ये आढळणारे कार्बन ब्लॅक हे घटक कर्करोगाशी संबंधित असू शकतात.केसांच्या रंगांमधील रसायने थेट त्वचेच्या संपर्कात येतात किंवा केल रंगवण्याच्या प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या धुरात श्वास घेतल्याने किंवा सतत त्याच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका वाढतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमित वापरल्या जाणाऱ्या डिओड्रंट्स आणि लोशन्समधील सुगंधी घटक शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनसारखे कार्य करतात, ज्यामुळे पेशींच्या अनियमित वाढीचा धोका वाढतो.केमिकल-फ्री, पॅराबेन-फ्री किंवा नॅचरल अशा प्रकारची लेबल्स असलेली उत्पादनं वापरण्याचा प्रयत्न करा.नैसर्गिक पर्याय जसे की कोरफडीचा गर, नारळाचे तेल, बेकिंग सोडा किंवा लिंबूवर्गीय अशा सुगंधी तेलांपासून बनवलेले डिओड्रंट्स अधिक सुरक्षित ठरू शकतात.चांगल्या आरोग्यासाठी सुंदरतेसोबतच सुरक्षिततेलाही प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ॲान्कोलॅाजिस्ट डॅा. अमोल पवार यांनी स्पष्ट केले.
सौंदर्य प्रसाधनांचा वापर पूर्णपणे टाळणे शक्य नाही. परंतु योग्य माहिती, त्यातील घटकांची तपासणी आणि सुरक्षित पर्यायांची निवड केल्यास रसायनांमुळे होणारा संभाव्य कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतो. त्वचा सुंदर राहण्यासाठी नुसती केमिकल्सचा वापर न करता सुरक्षितता आणि जागरूकता पसरविणे गरजेचे आहे.
शार्प जो लाईन हवीये? हा व्यायाम करत चला, मिळवाल हवा तसा लुक
Ans: सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात जास्त वेळ राहणे किंवा टॅनिंग बेडचा वापर केल्याने धोका वाढतो.
Ans: मेलेनोमा, बेसल सेल आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा.
Ans: त्वचेवर नवीन डाग किंवा तीळ तयार होणे. जुन्या तीळचा आकार, रंग किंवा स्वरूप बदलणे.






