कपाळावर टक्कल पडण्याची भीती वाटते? मग सकाळच्या नाश्त्यात नियमित खा बीट आवळा डोसा
हल्ली केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. महिलांसह पुरुषांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर केस गळतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर केस आणखीनच खराब होऊन जातात. त्यामुळे कायमच केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केस गळून केसांवर टक्कल पडल्यानंतर वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या वाढीसाठी कोणत्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. केसांच्या वाढीसाठी केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी सकाळच्या नाश्त्यात बीट आवळा डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पदार्थाच्या सेवनामुळे शरीराला योग्य पोषण मिळेल आणि केस मजबूत राहतील. बीट खाल्यामुळे केस नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार राहतात.
आवळा बीट डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटची साल काढून बारीक तुकडे करा आणि आवळ्याच्या आतील बी काढून बारीक तुकडे करा.
मिक्सरच्या भांड्यात बीट आणि आवळ्याचे तुकडे टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा.
तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करा.
त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात काळीमिरी पावडर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
तवा गरम करून त्यावर गोलाकार डोसा टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आवळा बीट डोसा.
दैनंदिन आहारात नेहमीच बीट आणि आवळ्याचे सेवन करावे. हे दोन पदार्थ महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतात. बीटमध्ये फायबर्स, नायट्रेट, अँटी ऑक्सिडेंट्स आणि विटामिन मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा बीट आणि आवळा खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बीट आणि आवळ्याचा रस नियमित प्यायल्यास आठवडाभरात शरीरात अनेक बदल दिसून येतील.