
फोटो सौजन्य: Freepik
हल्लीच्या जंक फूड आणि खराब दिनचर्येमुळे आपल्या शरीराच्या वेगवेळ्या भागांवर परिणाम होत असते. हे परिणामांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर याचे रूपांतर आजरांमध्ये सुद्धा होऊ शकते. या सवयींमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना लिव्हरचा त्रास होऊ लागतो. असे झाल्यास अनेक जण औषधांचा व योग्य आहाराचा आधार घेतात. पण याच चांगल्या सवयींबरोबर आपण अजून एक सवय आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केली पाहिजे. ती म्हणजे योगा. चला तर मग जाणून घेऊया अशा पाच योगासनाबद्दल जे तुमच्या लिव्हरची कार्यक्षमता चांगली ठेवेल.
वज्रासन
हे योगासनं करण्यासाठी सर्वप्रथम आपले पाय वाकवा व गुडघ्यावर बसा. यानंतर तुमच्या पायाचे पंजे उलटे मागे खेचा व त्यांना एकत्र जोडून पायांचे अंगठे एकमेकांवर क्रॉस करा. यानंतर तुमचे शरीर खाली अशा प्रकारे आणा की तुमचे नितंब पायावर राहील आणि मांड्या पोटरीच्या स्नायूंवर. यानंतर तुमचे हात गुडघ्यावर, डोकं सरळ आणि नजर समोर असू द्या. यानंतर श्वास घेण्यावर व सोडण्यावर लक्ष द्या. गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा गुडघ्याला दुखापत असलेल्या लोकांनी हे आसन टाळावे.
पद्मासन
हे असं करण्यासाठी, आपल्या डाव्या मांडीच्या वर आपला उजवा पाय ठेवून बसा. डावा पाय उचला आणि उजव्या मांडीवर वरच्या दिशेने तोंड करून ठेवा. पाय नितंबांच्या जवळ खेचा. आपले गुडघे जमिनीवर ठेवा. यानंतर तुमचे तळवे वरच्या दिशेने गुडघ्यावर ठेवा. जर तुमच्या गुडघ्याला किंवा घोट्याला दुखापत झाली असेल तर हे आसन टाळा.
बद्ध कोणासन
दंडासनापासून बद्ध कोनासन सुरू करा. आपले पाय वाकवा आणि आपल्या पायांचे तळवे एकत्र आणा. टाचांना तुमच्या जवळ ओढा. हळूवारपणे गुडघे खाली दाबा. श्वास सोडा, शरीराचा वरचा भाग पुढे वाकवा आणि आपले कपाळ जमिनीवर ठेवा. 30 सेकंद असेच राहा आणि तीन वेळा याची पुनरावृत्ती करा.
उर्ध्व मुख संवासन
पोट खाली ठेऊन जमिनीवर सरळ झोपा. तुमचे पाय खालच्या दिशेने असले पाहिजेत तर तुमचे हात तुमच्या शरीराच्या शेजारी असले पाहिजेत. आपला कोपर वाकवा आणि तळवे आपल्या खांद्याच्या खाली ठेवा. यानंतर श्वास घ्या, तळवे जमिनीवर घट्ट दाबा आणि तुमचे गुडघे, नितंब आणि धड चटईवरून उचला. सरळ कोपरांसह हात मजबूत ठेवा. आपले खांदे रुंद करा आणि वरच्या दिशेने पहा. यावेळी तुमचे गुडघे जमिनीला स्पर्श करणार नाहीत याची काळजी घ्या. पायाची बोटे जमिनीवर दाबा. काही सेकंद या स्थितीत रहा आणि नांतर श्वास सोडा.
चतुरंग दंडासन
श्वास सोडताना, अर्धा पुश-अप करत शरीर खाली आणा. वरचे हात घरातील लादीच्या समांतर ठेवा. 90 अंशाचा कोन राखण्यासाठी, कोपर बाजूंना स्पर्श करत ठेवा. खांदे आत खेचा आणि तुमचे मनगट आणि कोपर जमिनीवर समांतर आहे याची खात्री करा. या स्थतीत फक्त तुमचे दोन्ही हात आणि पायाची बोटं जमिनीवर असेल.