
थंडीच्या दिवसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
थंडीत दिसून येणारी उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे?
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
उच्च कोलेस्ट्रॉलची गंभीर लक्षणे?
संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यातील अतिशय सामान्य वाटणारी पण हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेली समस्या म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल. बदलती जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, झोपेची कमतरता, अपचन, वारंवार जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. हा चिकट थर शरीरात चरबीच्या स्वरूपात तसाच साचून राहतो. शरीरात जमा झालेल्याउच्च कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या आरोग्याचे गंभीर नुकसान होते.(फोटो सौजन्य – istock)
उच्च कोलेस्ट्रॉलची गाठी रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतात. ज्याच्या परिणामामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत, अन्यथा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. चुकीचा आहार आणि जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
रक्तात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे अतिशय तीव्र होतात आणि शरीराला हानी पोहचते. याला सायलेंट किलर आजार असे सुद्धा म्हंटले जाते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यानंतर शरीराचा रक्तपुरवठा थांबतो आणि रक्ताच्या गाठी तयार होतात. या गाठी रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतात, ज्यामुळे हृदयाला ऑक्सिजन पुरवठा होत नाही. चला तर जाणून घेऊया उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कच्चा लसूण चावून खावा. यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक नष्ट होऊन जातात. हृदयाच्या आरोग्य कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्य, बिया आणि सुका मेवा इत्यादी पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.
Ans: कोलेस्टेरॉल हा शरीरातील एक प्रकारचा मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ आहे, जो पेशी तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असतो.
Ans: वाईट कोलेस्टेरॉल, चांगले कोलेस्टेरॉल
Ans: अयोग्य जीवनशैली, आनुवंशिकता