हाडांचे कॅल्शियम वाढवण्यासाठी हे पदार्थ प्रभावी
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे, खाण्यापिण्याच्या सवयींकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. पूर्वीच्या काळी वयाच्या साठीमध्ये हाड आणि आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत होत्या, मात्र हल्ली चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम वयाच्या 20 व्या वर्षातच दिसून येत आहे. हाड दुखणे, पाठ कंबर दुखणे, सांधेदुखी, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या आजच्या तरुणाईला जाणवत आहेत. हाडांसंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊन जाते. शरीरात कॅल्शियमचे नसेल तर हाडांचे दुखणे सतत जाणवू लागते.
शरीरात कॅल्शियमची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसेल तर हाडं कमकुवत होणे,सतत सांधे दुखणे, हात पाय दुखणे, हाडांमधून आवाज येऊ लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चेहऱ्यावर हवा आहे नैसर्गिक ग्लो? मग नियमित करा ‘या’ हर्बल टी चे सेवन, त्वचा होईल मोत्यासारखी सुंदर
शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात पांढऱ्या तिळाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी रोज एक चमचा पांढरे तीळ खाल्यास कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होईल. पांढऱ्या तिळांपासून तुम्ही लाडू किंवा चटणी बनवून ठेवू शकता. यामुळे तुमची हाड मजबूत होतील आणि हाडांमधील लवचिकता वाढण्यास मदत होईल.
कमळाच्या बियांपासून बनवलेले मखाणे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. मखाणा खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा थकवा कमी होतो. स्नॅकच्या स्वरूपात तुम्ही मखाणाचे सेवन करू शकता. हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात मखाणाचे सेवन करावे, जेणेकरून शरीरातील कॅल्शियम वाढण्यास मदत होईल.
किंमतीला महाग असलेले अंजीर आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. अंजीर खाल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही ओले किंवा सुके असे कोणत्याही प्रकारच्या अंजीरचे सेवन करू शकता. हाडांच्या मजबूत आरोग्यासाठी नियमित 2 ते 3 अंजीर खावेत. यामुळे हाड मजबूत होऊन हाडांमध्ये लवचिकता वाढण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: रताळ्याचे हे 9 फायदे तुम्हाला माहितेय?
कॅल्शियम युक्त नाचणीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. नाचणीपासून तुम्ही नाचणी सत्व, भाकरी, लाडू इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. नाचणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमसह इतर अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात नाचणीचे सेवन करा.