Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eye Care Tips: किचनमध्ये ठेवलेल्या ‘या’ गोष्टींमुळे डोळ्यांना पोहचते हानी, इन्फेक्शन वाढून दृष्टी होईल कमी

स्वयंपाक घरात किचन क्लीनर किंवा इतर केमिकल युक्त प्रॉडक्ट, मसाले उघडे ठेवल्यास डोळ्यांना हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाक घरात वस्तू योग्य जागेवर ठेवाव्यात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 01:43 PM
किचनमध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टींमुळे डोळ्यांना पोहचते हानी, इन्फेक्शन वाढून दृष्टी होईल कमी

किचनमध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टींमुळे डोळ्यांना पोहचते हानी, इन्फेक्शन वाढून दृष्टी होईल कमी

Follow Us
Follow Us:

तासनतास एका जागेवर बसून टीव्ही पाहणे, मोबाईल लॅपटॉपचा अतिवापर इत्यादी अनेक कारणांमुळे डोळ्यांना हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. मानवी शरीरातील डोळे हा अवयव अतिशय नाजूक आणि संवेदनशील आहे. हल्ली लहान वयात मुलांना चष्मा लागतो तर काहीवेळा डोळ्यांचे ऑपरेशन सुद्धा करावे लागते. डोळ्यांना हानी पोहचल्यानंतर त्यातून बरे होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे कायमच डोळ्यांची खूप जास्त काळजी घ्यावी. केवळ मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळेच नाहीतर स्वयंपाक घरात ठेवलेल्या रोजच्या वापरातील वस्तूंमुळे डोळ्यांना हानी पोहचण्याची शक्यता असते. केमिकल युक्त प्रॉडक्ट आणि सतत चुकीच्या गोष्टींचा वापर केल्यामुळे डोळ्यांना इजा होते.(फोटो सौजन्य – AI)

Kitchen Tips: कांदा कापताना डोळ्यांत पाणी येते? ‘या’ घरगुती उपायांनी होईल समस्या दूर

डोळे अतिशय संवेदनशील असल्यामुळे डोळ्यात काही गेल्यानंतर सुद्धा लगेच डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे किंवा डोळ्यांच्या इतर समस्या सुद्धा उद्भवू शकतात. डोळ्यांच्या समस्या वाढू लागल्यानंतर डोळ्यांमध्ये जळजळ होणे, पाणी येणे तर काहीवेळा गंभीर इन्फेक्शन होण्याची खूप जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरात ठेवलेल्या कोणत्या वस्तूंमुळे डोळ्यांना इजा पोहचते, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. त्यामुळे तुमच्या स्वयंपाक घरात सुद्धा या वस्तू असतील तर वेळीच योग्य जागेवर ठेवाव्यात.

किचन क्लीनर:

स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी किचन क्लीनरचा वापर केला जातो.यामुळे किचनवर सांडलेले तेल आणि चिकट थर पूर्णपणे निघून जातात. पण किचन क्लीनर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या हानिकारक केमिकल्सचा वापर केला जातो. ब्लीच, अमोनिया किंवा इतरही अनेक केमिकल असल्यामुळे डोळ्यांना हानी पोहचते. त्यामुळे किचन क्लीनरचा वापर करताना जपून करावा.

एक्सपायर झालेले स्प्रे क्लीनर:

बऱ्याचदा किचनमधील गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जात नाही. वर्षानुवर्षे त्याच ठराविक वस्तूंचा वापर केला जातो. पण किचनमधील एक्सपायर झालेले स्प्रे क्लीनर टाकून देणे फार आवश्यक आहे. हे क्लीनर जास्त दिवस साचून राहिल्यामुळे हवेत पसरण्याची जास्त शक्यता असते. हवेत पसरलेल्या कणांमुळे डोळ्यांना हानी पोहचते. त्यामुळे जुने क्लीनर प्रॉडक्ट्स स्वयंपाक घरात तसेच साठवून ठेवू नये. नको असलेले प्रॉडक्ट टाकून द्यावेत.

Fridge Storage Tips: प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय? चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होईल नुकसान

उघड्यावर ठेवलेले मसाले:

बऱ्याचदा किचनमध्ये लाल मिरची पावडर, हळद, जिरे पूड किंवा इतरही किचनमधील मसाले उघडे ठेवले जातात. पण उघड्या ठेवलेल्या मसाल्यांचे कण हवेत पसरल्यामुळे डोळ्यांमध्ये जातात आणि डोळ्यानं हानी पोहचते. त्यामुळे मसाले कायमच बंद डब्यात भरून ठेवावेत आणि कुठेही ठेवू नयेत. किचनमध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. कोणत्याही ठिकाणी वस्तू ठेवू नयेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These items kept in the kitchen can harm your eyes increased infection could lead to reduced vision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • cleaning hacks
  • cleaning tips
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Health: ट्रेडमिल की इलेप्टिकल? Weight Loss करण्यासाठीं कोणता कार्डीओ ठरेल सर्वात बेस्ट? जाणून घ्या
1

Health: ट्रेडमिल की इलेप्टिकल? Weight Loss करण्यासाठीं कोणता कार्डीओ ठरेल सर्वात बेस्ट? जाणून घ्या

आपण आपल्या आयुष्यात सरासरी किती किलोमीटर चालतो? जाणून घ्या हे रंजक तथ्य!
2

आपण आपल्या आयुष्यात सरासरी किती किलोमीटर चालतो? जाणून घ्या हे रंजक तथ्य!

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च
3

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च

स्तनपान करताना ‘या’ चुकीच्या समजुतींवर अजिबात ठेवू नका विश्वास; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
4

स्तनपान करताना ‘या’ चुकीच्या समजुतींवर अजिबात ठेवू नका विश्वास; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.