कांदा कापताना त्यातील पेशी तुटतात आणि त्यातून सल्फरयुक्त संयुगे बाहेर पडतात. डोळ्यांतील ओलाव्याशी संपर्कात आल्यावर जळजळ निर्माण करतात. परिणामी कांदा कापताना डोळ्याच पाणी येते.
कांदा चिरण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील रासायनिक प्रक्रिया मंदावते. त्यामुळे हवेत कमी प्रमाणात वायू पसरतो आणि डोळ्यांची जळजळ कमी होते.
बोथट सुरीमुळे कांदा जास्त चिरडला जातो आणि अधिक वायू बाहेर पडतात. धारदार सुरीने कांदा स्वच्छ कापला जात असल्याने डोळ्यांवर होणारा परिणाम कमी होतो.
किचनमधील एक्झॉस्ट फॅन, चिमणी किंवा उघडी खिडकी यांचा वापर केल्यास कांद्याचे वायू लगेच बाहेर निघून जातात. त्यामुळे ते डोळ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होते.
कांद्याच्या मुळाजवळ अश्रू निर्माण करणारे घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हा भाग शेवटी कापल्यास डोळ्यांवर होणारा त्रास कमी होऊ शकतो.
कांदा चिरताना चॉपिंग बोर्डजवळ ओला टिश्यू ठेवल्यास काही वायू त्यात शोषले जाऊ शकतात. तसेच चष्मा किंवा गॉगल वापरल्यास डोळ्यांचे थेट संरक्षण होते.
कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येणे ही सामान्य समस्या असली तरी काही साध्या आणि प्रभावी उपायांच्या मदतीने हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे पुढच्या वेळी स्वयंपाक करताना या टिप्स नक्की वापरून पाहा आणि कांदा चिरण्याचा अनुभव अधिक सोपा आणि आरामदायी बनवा.
Moong Bhaji: संध्याकाळसाठी परफेक्ट स्नॅक्स! बनवा मूग डाळीची खुसखुशीत भजी; वाचा सोपी रेपिसी






