Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ चुकांमुळे चहा होतो विषारी, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत, पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

वारंवार गरम केलेला चहा प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. ॲसिडिटी, पित्त आणि पचनाच्या समस्या उद्भवून पचनक्रिया बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया चहा बनवण्याची योग्य पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 24, 2025 | 08:49 AM
'या' चुकांमुळे चहा होतो विषारी, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत

'या' चुकांमुळे चहा होतो विषारी, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

चहा बनवण्याची सोपी पद्धत?
चहा जास्त वेळ उकळवून प्यायल्यास आरोग्याला पोहोचणारी हानी?
अतिप्रमाणात चहा पिण्याचे तोटे?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी आहेत. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिण्याची सवय असते. काहींना दुधाचा चहा पिण्याची सवय असते तर कधी ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी, पित्त, आंबट ढेकर इत्यादी पचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडते. चहामध्ये ‘टॅनिन’ नावाचा नैसर्गिक घटक आढळून येतो, जो आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. चहा बनवताना त्यात चहा पावडर, साखर आणि दूध मिक्स करून चहा बराच वेळ उकळला जातो, यामुळे चहामधील अपचनीय रासायनिक संयुगे तयार होऊन चहाची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. चहामध्ये तयार झालेला विषारी घटक शरीर सहज पचन करत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चहा बनवताना केलेली कोणती चूक शरीरासाठी घातक ठरते? चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, तणावापासून मिळेल कायमची सुटका

टॅनिन आणि प्रथिनांमधील रासायनिक प्रक्रिया:

चहा बनवताना त्यात दूध मिक्स केले जाते. त्यानंतर चहा बराच वेळ उकळवला जातो. चहाच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या टॅनिन असते तर दुधामध्ये प्रथिने आढळून येतात. हे दोन्ही घटक एकत्र मिक्स झाल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. टॅनिन आणि दुधातील प्रथिने एकत्र मिक्स झाल्यानंतर रासायनिक प्रक्रिया घडते. हे घटक पचनासाठी अतिशय कठीण असतात. अपचनीय घटक लिव्हरमध्ये गेल्यानंतर नैसर्गिक पचनक्रिया होत नाही, ज्यामुळे वारंवार मळमळ, उलट्या आणि अपचन होते. तसेच सतत गरम केलेला दुधाचा चहा प्यायल्यामुळे अपचन होऊन आरोग्य बिघडते.

दूध वेगळे गरम करणे:

वारंवार ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून दूध आणि चहाचे पाणी एकत्र उकळू नये. दूध आणि चहा वेगवेगळे गरम करून नंतर एकत्र करून प्यावे. चहा बनवताना सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात चहा पावडर, साखर, आले किंवा वेलची घालून व्यवस्थित उकळवून घ्या. चहाला उकळी आल्यानंतर चहा कपात ओतून वरून त्यात गरम केलेले दूध ओतून चहा प्यावा. दोन घटक स्वतंत्रपणे गरम केल्यामुळे हानिकारक प्रक्रिया होत नाही. याशिवाय अशा पद्धतीने चहा प्यायल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.

लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील ‘या’ चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

चहा खूप जास्त उकळण्याचे दुष्परिणाम:

काहींना सकाळी उठल्यानंतर खूप कडक गरम केलेला चहा पिण्याची असते. चहाची पावडर गरम दुधात किंवा पाण्यत जास्त वेळ उकळवु नये. यामुळे टॅनिन आणि कॅफीनचे प्रमाण वाढून आरोग्य बिघडते. चहा सतत गरम करून प्यायमुळे पोटाच्या आतील थरांना हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे चहाचा अर्क कमी होऊन जातो . कमी वेळ उकळलेला चहा चवीला सौम्य लागतो पण आरोग्यासाठी कमी घातक ठरतो. त्यामुळे वारंवार गरम केलेला दुधाचा चहा पिऊ नये. या चहात विषारी घटक तयार होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: नाश्त्यानंतर किंवा दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान चहा पिणे उत्तम मानले जाते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि ऊर्जा मिळते.

  • Que: चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य आहे का?

    Ans: चहावर लगेच पाणी प्यायल्याने दातांना कीड लागते किंवा आम्लपित्त (acidity) वाढते असे काही लोकांचे मत आहे, त्यामुळे तज्ज्ञ हे टाळण्याचा सल्ला देतात.

  • Que: चहाचे फायदे काय आहेत?

    Ans: चहामुळे ऊर्जा मिळते, कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि तणाव कमी होतो, तसेच ग्रीन टी चयापचय सुधारण्यास मदत करते.

Web Title: These mistakes can make tea toxic learn the correct way to make tea tea and acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Milk tea
  • side effect

संबंधित बातम्या

आतड्यांचा प्रत्येक कोपरा होईल मुळांपासून स्वच्छ! डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेले ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी, उद्भवणार नाही कॅन्सरचा धो
1

आतड्यांचा प्रत्येक कोपरा होईल मुळांपासून स्वच्छ! डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेले ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी, उद्भवणार नाही कॅन्सरचा धो

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर कायमच हिरव्या रंगाचे कपडे का परिधान करतात? कारण ऐकून व्हाल आश्चर्यचकित
2

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर कायमच हिरव्या रंगाचे कपडे का परिधान करतात? कारण ऐकून व्हाल आश्चर्यचकित

वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, तणावापासून मिळेल कायमची सुटका
3

वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, तणावापासून मिळेल कायमची सुटका

लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील ‘या’ चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू
4

लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील ‘या’ चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.