वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी
मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपाय?
वय वाढल्यानंतर आरोग्य बिघडण्याची कारणे?
निरोगी राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात?
वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे पचनक्रिया मंदावणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, सतत चिडचिड, अशक्तपणा इत्यादी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. शरीरसंबंधित वाढलेल्या आजारपणामुळे शरीर थकून जाते . सहज होणारी कामे करताना सुद्धा खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे वाढत्या वयात शरीर सक्रिय असणे आवश्यक आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे, शारीरिक हालचाली, योगासने किंवा ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यान केल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा कायमच निरोगी राहते. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)
ज्येष्ठ नागरिकांसाठी ६० वय हा एक महत्त्वाचा काळ आहे, कारण वय वाढत असताना शरीर आणि मन दोघांनाही विशेष काळजीची आवश्यकता असते. यासाठी आनंदी आणि सक्रिय असणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली, नियमित आरोग्य सेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन राखून, वृद्धापकाळात चांगले आणि अधिक समाधानकारक जीवन जगता येते. यासाठी काही सोपे मार्ग जाणून घेऊया.
तणाव व्यवस्थापित करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी ध्यान, संगीत थेरपी, बागकाम किवा धार्मिक/आध्यात्मिक उपक्रमांसाठी वेळ द्यावा. यामुळे मन शांत होईल आणि आनंद मिळेल.मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित ३० मिनिटं व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शारीरिक हालचाली सुधारतात आणि हाडांच्या वेदनांपासून आराम मिळतो. हलका व्यायाम करा. दररोज २०-३० मिनिटे चालणे, योगासने आणि प्राणायाम केल्याने लवचिकता टिकून राहते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
वयाबरोबर शरीराच्या गरजा बदलतात. म्हणून, आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने, हिरव्या भाज्या, डाळी आणि फळे यांचा समावेश असावा, जड, तेलकट किंवा जास्त गोड पदार्थ टाळा. चांगली झोप शरीराला पुनरुज्जीवित करण्याची आणि मानसिक शांती राखण्याची संधी देते. दररोज ६ ७ तास झोपा आणि झोपण्याची वेळ निश्चित ठेवावी.
पुरेसे पाणी न पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, नारळ पाणी, सूप आणि हर्बल टी सारखे पर्याय उत्तम आहेत. नियमित वैद्यकीय तपासणी आणि रक्तदाब, साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉलचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यामुळे वेळेत आजार टाळता येतात.






