'या' लोकांनी दैनंदिन आहारात चुकूनही करू नका तूपाचे सेवन
तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुपाचे सेवन रोजच्या आहारात आवर्जून केले जाते. डाळ, भात, चपाती किंवा इतर गोड पदार्थ बनवताना तूप वापरले जाते. तुपाचा वापर पूर्वीच्या काळापासून जेवण बनवण्यासाठी आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये केला जातो. तूप खाल्यामुळे शरीरात उबदारपणा टाकून राहतो. त्यामुळे नियमित तुपाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक चमचा तूप खाल्यास आरोग्यासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतील. थंडीच्या दिवसांमध्ये तुपाचा वापर करून बनवलेले पौष्टिक लाडू आवडीने खाल्ले जातात. याशिवाय सर्दी, खोकला झाल्यानंतर गरम दुधात तूप टाकून पिऊ शकता. पण काही लोकांच्या आरोग्यासाठी तूप हा पदार्थ अतिशय घातक आहे. तुपाचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात तुपाचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चालण्याच्या ‘या’ सवयींमध्ये करा बदल, आठवड्याभरात दिसून येईल फरक
काही वर्षांआधी अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले होते की, तुपाचे सेवन करणे काही लोकांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात. कोणतेही जुनाट आजार असलेल्या रुग्णांना तूप न खाण्याचा सल्ला दिला जातो.
वारंवार पोट दुखी किंवा पचनसंबंधित समस्या उद्भवणाऱ्या लोकांनी आहारात तुपाचे सेवन करू नये. तुपाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तुपामध्ये असलेल्या चरबीचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. पचनसंस्थेवर परिणाम झाल्यामुळे पोटात दुखणे, गॅस, अपचन होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.
ज्या व्यक्तींना लिव्हरसबंधित समस्या उद्भवत असतील अशांनी आहारात तुपाचे सेवन करू नये. तुपामध्ये आढळून येणाऱ्या गुणधर्मांमुळे लिव्हरला सूज येण्याची शक्यता असते. याशिवाय लिव्हरचे आजार वाढू शकतात. लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे लिव्हरसबंधित समस्या असलेल्या लोकांनी तूप खाऊ नये.
हृदयसंबंधित आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात तूप खाऊ नये. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्याला धोका होतो. यामध्ये असलेले फॅट्स कोलेस्ट्रॉलची पातळी वाढतात. जे हृदयासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे हृद्यरोगाने त्रस्त असलेल्या लोकांनी तूप खाऊ नये.
रात्रीच्या वेळी उशिरा झोपता? वाढू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, वेळीच करा चुकीच्या सवयींमध्ये बदल
दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर अॅलर्जी होणाऱ्या लोकांनी आहारात तुपाचे सेवन करू नये. कारण दुग्धजन्य पदार्थांपासून तूप बनवले जाते. ज्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते