पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चालण्याच्या 'या' सवयींमध्ये करा बदल
पोटावर आणि शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी महिला आणि पुरुष सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे तर कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रोटीन ड्रिंक प्यायले जातात. मात्र याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे डाएटिंग केल्यामुळे शरीरावर नकरात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टी करताना शरीराला सूट होईल की नाही याची योग्य माहिती घेऊन मगच करावी. वजन कमी करण्यासाठी अनेक महिला एक वेळेचं जेवण केले जाते. मात्र असे केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना योग्य आहार घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिम किंवा डाईट करण्याऐवजी चालणे आवश्यक आहे. नियमित चालल्यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते आणि शरीराला अनेक फायदे होतात. नियमित चालल्यामुळे शरीराचे स्नायू सक्रिय होतात आणि कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी कमी होते. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी चालण्याच्या कोणत्या सवयींमध्ये बदल करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक चालण्यासाठी जातात. मात्र हळूहळू चालल्यामुळे शरीरावर वाढलेली चरबी कमी होत नाही. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगाने चालणे आवश्यक आहे. वेगाने चालल्यामुळे हृदयाची गती वाढते आणि श्वास घेण्याच्या प्रक्रिया वाढू लागते. यामुळे शरीरात कॅलरीज बर्न होतात. वेगाने चालल्यामुळे शरीराचे चयापचय वाढते.
पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चालण्याच्या ‘या’ सवयींमध्ये करा बदल
काहींना चालल्यानंतर लगेच थकल्यासारखे वाटते किंवा दम लागतो. अशावेळी तुम्ही वाढलेले वजन कमी करण्यासाठी इंटरवल वॉकिंग करू शकता. थोडेसे चालून नंतर विश्रांती घेत चालल्यामुळे शरीराचे चयापचय वाढते आणि कॅलरीज बर्न होतात. यासाठी तुम्ही दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी चालण्यास जाऊ शकता.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी शरीर सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. डोंगरावर चालण्यासाठी डोंगर आणि उंच ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. यासाठी तुम्ही घराच्या पायऱ्यांवर किंवा पायऱ्या असलेल्या ठिकाणी चालण्यासाठी जाऊ शकता.
सांध्यांमधील लवचिकता वाढवण्यासाठी मधात मिक्स करा ‘या’ फळाची पावडर, वयाच्या ७० मध्ये हाडं राहतील टणक
शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित चालणे आवश्यक आहे. नियमित चालल्यामुळे सर्व आजार बरे होतात. यासाठी नियमित 20 ते 30 मिनिटं चालणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबत मानसिक तणाव आणि मूड सुधारण्यास मदत होते. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित 15 मिनिटं चालणे आवश्यक आहे.