रात्रीच्या वेळी उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम
धावपळीच्या जीवनशैलीमुळे सगळ्यांची जीवन जगण्याची पद्धत बिघडली आहे. वाढलेला कामाचा तणाव, आहारात सतत होणारे बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अशात हल्लीची तरुणाई झोपेसंबंधित चुकीचे रुटीन फॉलो करत असल्यामुळे कमी वयातच अनेक गंभीर आजारांमध्ये वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. मात्र तरीसुद्धा अनेक लोक रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठतात. यामुळे शरीरात झोपेची कमतरता निर्माण होते.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चालण्याच्या ‘या’ सवयींमध्ये करा बदल, आठवड्याभरात दिसून येईल फरक
रात्रीच्या वेळी अधिककाळ जाग राहिल्यामुळे शरीरात झोपेची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे हृद्यासंबंधित समस्या किंवा पचनक्रिया बिघडू लागते. पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. त्यामुळे नियमित 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. उशिरापर्यंत काम, टीव्ही किंवा मोबाईल पाहत राहिल्यामुळे आरोग्यासोबतच डोळ्यांचे सुद्धा नुकसान होते. त्यामुळे कमीत कमी जागरणं करून योग्य वेळी झोपण्याचा प्रयत्न करावा. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे हाय ब्लड प्रेशर किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी योग्य वेळात झोपावे. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. रात्री उशिरा झोपल्यामुळे शरीरात इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि गंभीर आजार होतात. शरीरात होणारे हार्मोन्सचे असंतुलन, पचनसंबंधित समस्या, त्वचा आणि केसांसंबधित समस्या, मधुमेह इत्यादी गंभीर आजार वाढण्याची शक्यता असते. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूची स्मरणशक्ती कमजोर होते आणि मानसिक तणाव वाढू लागतो. शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्रीच्या वेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. विश्रांती घेतल्यामुळे शाररिक आणि मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे झोप घेणे आवश्यक आहे. वयोमानानुसार किती वेळ झोपणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया. शाळेत जाणाऱ्या मुलांनी कमीत कमी 9 ते 13 तास झोप घेणे आवश्यक आहे, तर टीनएजर्सनी 9 ते 10 तास, तरूणांनी 7 ते 9 तास झोप घ्यावी. तर वृद्धांनी सुद्धा 7 ते 9 तास झोप घेणे आवश्यक आहे.
रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित रात्री जेवण झाल्यानंतर २ तासांनी झोपावे. साधारणता रात्री 10 वाजता झोपणे आवश्यक आहे. ज्यावेळी सूर्यास्त होतो तेव्हा शरीरामध्ये मेलिटेनियम हार्मोन रिलीज होऊ लागतात, जे झोपेसाठी आवश्यक आहेत. तसेच सकाळ झाल्यानंतर ते संपून जातात.