Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips: शरीरात वात वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे

शरीरात वात वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या वात वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 08:36 AM
Health Care Tips: शरीरात वात वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे

Health Care Tips: शरीरात वात वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे

Follow Us
Follow Us:

शरीरात वात कशामुळे वाढतो?
वात वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
वात कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरासंबंधित सतत काहींना काही आजार होतात. वात, पित्त आणि कफ अशा प्रकृती मानवी शरीरात असतात. त्यातील कोणतीही एक प्रकृती प्रत्येकाच्या शरीरात असते. त्यामुळे होणारे आजार सुद्धा वेगळा असतात. शरीरात पित्त, कफ किंवा वात गरजेपेक्षा जास्त वाढल्यानंतर आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. यामुळे त्रास सुद्धा वेगवेगळा उद्भवतो. आज आम्ही तुम्हाला शरीरात वात वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

वात वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे:

शरीरामध्ये वात वाढल्यानंतर त्वचेतील ओलावा कमी होऊन जातो. त्वचा खूप जास्त कोरडी पडते. ओठ फाटणे, पायांना भेगा पडणे, त्वचेवर बारीक रेषा किंवा सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेसोबतच केसांच्या समस्या सुद्धा उद्भवण्याची जास्त शक्यता असते. केस झाडूसारखे अतिशय कोरडे आणि रखरखीत होऊन जातात. सांध्याचे दुखणे वाढल्यानंतर बऱ्याचदा लक्ष दिले जात नाही. कायमच दुर्लक्ष केल्यानंतर शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. उठताबसता गुडघे, पाय, घोटा दुखणे, पाठ, कंबर, मानेत वेदना होणे इत्यादी संध्यासाबंधित लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात वात वाढल्यानंतर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

अनेकांना वात वाढल्यानंतर खूप जास्त थंडी वाजते. त्यामुळे कितीही उबदारपणा असून सुद्धा थंडी वाजते. वात वाढल्यानंतर दिसून येणारे प्रमुख लक्षण म्हणजे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्यामुळे भूक मंदावते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही. शरीरात वात वाढल्यानंतर स्नायूंमधील ऊर्जा पूर्णपणे कमी होऊन जाते. मनात सतत चिडचिड किंवा अतिविचार निर्माण होतात.

वाढत्या वयात आनंदी आणि तणावमुक्त राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, वृद्धकाळ जाईल आनंदात

शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी उपाय:

रामदेव बाबा यांच्या मते, अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्यामुळे शरीरात वाढलेला वात कमी होण्यास मदत होतो. तसेच दैनंदिन आहारात थंड पदार्थांचे सेवन, ताक, दही, घरी बनवलेल्या ताज्या अन्नपदार्थांचे नियमित सेवन करावे. तसेच आहारात गोड, जास्त तिखट, मसालेदार पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यांच्या वेळा व्यवस्थित फॉलो करणे आवश्यक आहे. कायमच निरोगी आणि तणावमुक्त जीवनशैली जगण्यासाठी व्यायाम, ध्यान करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These serious symptoms appear after the increase of vata in the body ignoring it will be dangerous for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
1

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
2

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.