Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही महिने आधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू

महिलांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2026 | 08:29 AM
सावधान! महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही महिने आधी दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू

सावधान! महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही महिने आधी दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू

Follow Us
Follow Us:

हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी उपाय?
हार्ट अटॅकची लक्षणे?
महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी का असतात?

जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेज किंवा शरीरसंबंधित इतर घातक आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. हार्ट अटॅक केवळ पुरुषांचं नाहीतर महिलांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकची लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि धूम्रपान इत्यादींसोबत महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम सुद्धा आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाही. यामुळे गंभीर आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते.(फोटो सौजन्य – istock)

गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या

महिलांमध्ये दिसून येणारे जोखमीचे घटक म्हणजे गर्भावस्थेतील मधुमेह, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, ताण-तणाव, चिंता, हार्मोनल बदल, ऑटोइम्यून आजार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या हृदयावर होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या अतिशय नाजूक लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया महिलांमध्ये दिसून येणारी हार्ट अटॅकची गंभीर लक्षणे.

महिलांमध्ये दिसून येणारी हार्ट अटॅकची लक्षणे:

  • मान, जबडा आणि पाठीमध्ये वेदना होणे
  • खूप जास्त घाम येणे
  • वारंवार उलट्या आणि मळमळ
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • पाठीमध्ये किंवा पोटात जडपणा जाणवणे
  • अ‍ॅसिडिटीसारखी जळजळ होणे
  • शरीरात अचानक थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे
महिला स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाही. सतत कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाच्या तणावामुळे शरीराकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात आणि आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. अ‍ॅसिडिटी, थकवा किंवा शरीरात वाढलेल्या अशक्तपणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. महिलांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या अतिशय छोट्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये गुंतागुंती निर्माण झाल्यानंतर आजाराचे निदान लवकर होत नाही. शेवटच्या टप्प्यात महिलांच्या हृदयावर गंभीर परिणाम दिसतो.

लघवी करताना कायमच जळजळ होते? लघवीच्या रंगावरून ओळखा गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे

हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी उपाय:

हृदयाच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पालेभाज्या,फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. यासोबतच नियमित ध्यान केल्यास मानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल. रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाशी पोटी नियमित कच्चा लसूण चावून खावा. लसूण खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते. धूम्रपान आणि मद्यपान इत्यादी गोष्टींपासून लांब राहावे. तसेच ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात?

    Ans: छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, अत्यंत थकवा, मळमळ, चक्कर येणे, पाठ, मान किंवा जबड्यात वेदना ही लक्षणे काही महिने आधी दिसू शकतात.

  • Que: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लक्षणे वेगळी असतात का?

    Ans: होय, महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे सौम्य किंवा वेगळी असू शकतात. छातीत तीव्र वेदना नसतानाही थकवा, घाम येणे किंवा अपचनासारखा त्रास जाणवू शकतो.

  • Que: कोणत्या महिलांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

    Ans: उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, धूम्रपान, ताणतणाव आणि हार्मोनल बदल (मेनोपॉज) असलेल्या महिलांना धोका जास्त असतो.

Web Title: These serious symptoms appear months before a heart attack in women and can lead to death if ignored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • heart attack
  • heart blockage
  • heart problems

संबंधित बातम्या

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत
1

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.