(फोटो सौजन्य: istock)
Travel Trend 2026 : महागडे स्पॉट सोडून आता स्वस्त ठिकाणांकडे अधिक वळू लागलेत पर्यटक, जाणून घ्या कारण
संशोधनातून काय समोर आले
यासाठीचे सर्वात मोठे संशोधन जाॅन बर्न्स यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यांनी लिंच सिंड्रोम असलेल्या एका रुग्णावर मोठी चाचणी केली. लिंच सिंड्रोम ही एक अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामुळे लोकांना कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या जास्त असतो. या अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक ॲस्पिरिन गोळी घेत आहेत त्यांच्यात कर्करोगाचा धोका जवळपास निम्म्याने कमी झाला आहे. साधारण १० वर्षे चाललेल्या या चाचणीत ॲस्पिरिनचा ६०० मिग्रॅ डोस वापरण्यात आला आणि त्याचे परिणाम इतके प्रभावी होते की अनेक देशांमध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यात आली. त्यानंतर ७५ ते १०० मिग्रॅ या कमी डोसचा वापर करून केलेल्या जेव्हा अभ्यासात तपासले गेले तेव्हा हे समोर आले की, कमी प्रमाणात ॲस्पिरिन घेतल्यानंतरही याचा प्रभाव तितकाच चांगला असू शकतो.
याप्रमाणेच स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये अॅना मार्टलिंग यांच्या नेतृत्वाखाली २,९८० रुग्णांवर रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल करण्यात आले होते. यात आढळून आले की, शस्त्रक्रियेनंतर दररोज अॅस्पिरिन घेणाऱ्या रुग्णांमध्ये कर्करोग पुन्हा होण्याचा धोका निम्म्याहून कमी झाला आहे. २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाने वैदकीय पद्धतींमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.
ॲस्पिरिन कसे काम करते
आता आपल्याला प्रश्न पडेल की, ॲस्पिरिन कर्करोगाला कमी करण्यास कसे मदत करते. तर याविषयी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या कर्करोग तज्ज्ञ रूथ लँगली यांनी सांगितले की, हे औषध शरीरातील विविध प्रकियांवर परिणाम करते ज्याचा संबंध कर्करोगाशी जोडलेला आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनानुसार, ॲस्पिरिन रक्त गोठण्यास मदत करणारे घटक कमी करू शकते, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी रोगप्रतिकार प्रणालीसमोर उघड होतात आणि शरीर त्यांना ओळखून नष्ट करू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवा
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ॲस्पिरिन काही जादुई उपाय नाही. याचे जसे आरोग्याला फायदे होतात त्याचप्रमाणे अतिसेवनाने याचे आरोग्याला नुकसान देखील होऊ शकते. अतिप्रमाणात ॲस्पिरिनचे सेवन केल्यास पोटात जळजळ, अल्सर किंवा अंतर्गत रक्तस्त्राव अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, ॲस्पिरिन कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते, परंतु त्याचा परिणाम प्रत्येकावर सारखा होत नाही. यामुळेच याचे सेवन करण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






