कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर त्वचेवर दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होईल अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल होण्यास सुरुवात होते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहतो.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहिल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. यामुळे हृदयविकाराचा धोका, स्ट्रोक इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी फॉलो न करता शरीराला पचन होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर त्वचेमध्ये कोणते बदल होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे डोळ्यांच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर डोळ्यांभोवती पिवळ्या रंगाचे डाग दिसून येतात. डोळ्यांभोवती आलेल्या पिवळ्या डागांना झेंथेलास्मा असे म्हणतात. याशिवाय लहान लहान मुरूम येण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या त्वचेभोवती अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते.
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर त्वचेचा रंग पिवळा पडू लागतो. त्यामुळे शरीरात ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. शरीरामध्ये व्यवथित रक्तभिसरण न झाल्यास त्वचेवर पिवळे डाग दिसू लागतात. याशिवाय त्वचेचा रंग पिवळा आणि हलका काळा होऊन जातो.
उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. त्वचेचा रंग हळूहळू निळा आणि जांभळा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय हातावर, पायावर किंवा चेहऱ्यावर निळे किंवा जांभळे डाग दिसू लागतात.
झोप पूर्ण करत चला रे! अपुरी झोप म्हणजे डोळे-नखांवर ‘या’ लक्षणांना आमंत्रण
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक नकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर त्वचेला सूज येणे, खाज सुटणे, जळजळ वाढणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसू लागणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.