
चालताना छातीमध्ये हलक्या वेदना होतात? हृदयविकाराचा झटका येण्याच्या १ महिना आधी शरीरात दिसू लागतात 'ही' लक्षणे
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसणारी लक्षणे?
हार्ट अटॅक येण्याची कारणे?
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी काय करावे?
जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, सतत जंक फूडचे आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन जीवनात केलेल्या छोट्या मोठ्या चुकांचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सतत तेलकट आणि तिखट मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगांचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला हा चिकट थर मृत्यूचे कारण ठरतो. यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. (फोटो सौजन्य – istock)
गर्भावस्थेत वाढतोय उच्च रक्तदाब धोका! ‘कामा आणि ऑलब्लेस’मधील अभ्यासात करण्यात आला धक्कादायक खुलासा
उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे हृदयाला आणि शरीराच्या इतर लहान मोठ्या अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे कोणत्याही क्षणी, हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर शरीरात अतिशय सामान्य पण जीवघेणी लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात सतत थकवा, अशक्तपणा आणि थोडस चालल्यानंतर लगेच थकवा किंवा वेदना होतात. हा त्रास अधूनमधून कोणत्याही वेळी होतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. घशापासून जबड्यापर्यंत वेदना जाणवू लागतात.
पायऱ्या चढताना, वेगाने चालताना किंवा थोडेसे हलके काम केल्यानंतर तुम्हाला लगेच धाप किंवा थकवा लागत असेल तर हे सामान्य लक्षण नाही. हृदयाला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे शरीरात ही लक्षणे दिसू लागतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे शरीराला हानी पोहचते.
बऱ्याचदा अचानकपणे पायांना सूज येते किंवा हातापायांमध्ये वेदना जाणवू लागतात. पाय, घोटे किंवा तळपायांवर सूज आल्यास शरीरात पाणी जमा होण्याचे लक्षण आहे. हृदयाचे रक्तभिसरण व्यवस्थित होत नसल्यामुळे पायांना सूज येते. शरीरात पाणी साचू लागल्यानंतर शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज येते.
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीराला प्रचंड घाम येऊ लागतो. थोडस काम केल्यानंतर लगेच शरीर थकून जाते. खांदेदुखी, काखेत वेदना, शरीर थंड पडणे, मळमळ उलटी होणे हे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहे. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.
Ans: हृदयविकाराचा झटका तेव्हा येतो जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (कोरोनरी धमन्या) अडथळा निर्माण होतो.
Ans: छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दाब, जडपणा, घट्टपणा किंवा पिळल्यासारखी वेदना होणे.
Ans: धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव, आणि अस्वस्थ आहार.