थंडीच्या दिवसांमध्ये ताक प्यावे का? ताक प्यायल्यानंतर पचनक्रियेवर कोणता परिणाम होतो
कोणत्या वेळी ताक प्यावे?
ताक पिण्याचे शरीराला होणारे फायदे?
ताकामध्ये आढळून येणारे घटक?
उन्हाळ्यासहा इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंडगार ताक पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. याशिवाय पचनक्रिया चांगली आणि मजबूत ठेवण्यासाठी नेहमीच एक ग्लास ताक प्यावे. वाढत्या थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी इत्यादी पचनाच्या समस्या वाढू लागल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. दिवसभर शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यास कायमच तुम्ही हायड्रेट राहाल आणि पचनक्रिया चांगली राहील. अनेकांना दुपारच्या जेवणात ताक किंवा दही खाण्याची सवय असते. यामध्ये असलेले चांगले बॅक्टरीया आतड्यांसाठी गुणकारी ठरतात. (फोटो सौजन्य – istock)
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले ताक संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. आहार तज्ज्ञांच्या मते, ताकात मोठ्या प्रमाणावर प्रोबायोटिक्स आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त गुणधर्म आढळून येतात. याशिवाय कॅल्शियम, प्रोटीन आणि विटामिन यांसारखे पोषक घटक सुद्धा ताकामध्ये असतात. त्यामुळे कायमच दुपारच्या जेवणानंतर ताकाचे सेवन करावे. योग्य प्रमाणात ताकाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. यामधील प्रोबायोटिक्स आणि अँटीऑक्सिडेटंस पचनक्रिया मजबूत ठेवून आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया शोषून घेतात. ताक प्यायल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होते.
ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीयाची वाढ होते. आतड्यांमध्ये वाढलेले चांगले बॅक्टरीया खाल्लेले अन्नपदार्थ लवकर पचन करतात. यामुळे पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवतात नाहीत. पण चुकीच्या वेळी ताक प्यायल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. गॅस, एसिडिटी, ब्लॉटिंग, पोट जड होणे यांसारख्या समस्या उद्भवू नये नये म्हणून नियमित एक ग्लासभर ताक प्यावे.
ओव्हरइटींगपासून बचाव करण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये ताकाचा समावेश करावा. ताक प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होते. शरीरातील घाण बाहेर पडून गेल्यानंतर पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. ताक बनवल्यानंतर तुम्ही त्यात जिऱ्याची पावडर, काळीमिरी पावडर, काळेमीठ, चुटकीभर चूर्ण घालून मिक्स करून प्यावे. थंडीच्या दिवसांमध्ये ताकाची कढी बनवून प्यावी. ताकाची कढी तुम्ही कोणत्याही पदार्थांसोबत खाऊ शकता.
सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी समस्यांनी त्रस्त असल्यास ताक किंवा थंड पदार्थांचे सेवन करू नये. याशिवाय रात्रीच्या वेळी चुकूनही ताक, दही किंवा थंड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. किडनी किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ताकात मीठ घालू नये. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
Ans: ताक म्हणजे दही किंवा ताजे लोणी घुसळून तयार केलेले पेय.
Ans: जेवणानंतर लगेच किंवा दुपारच्या जेवणानंतर पिणे उत्तम.सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा पिणे टाळावे.
Ans: चव आणि पचनासाठी भाजलेले जिरे, काळे मीठ






