हृदयात पाणी जमा झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयंकर लक्षणे
निरोगी आरोग्यासाठी शरीराचा प्रत्येक अवयव अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे शरीरातील सर्वच अवयवांची योग्य काळजी घ्यावी. हृद्य शरीराच्या प्रत्येक अवयवाला रक्त पोहचवण्याचे काम करते. याशिवाय हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. त्यामुळे नेहमीच चुकीची जीवनशैली फॉलो करता शरीरासाठी आवश्यक असलेले पदार्थ, भरपूर पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींकडे व्यवस्थित लक्षणे देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा पोट, लिव्हर किंवा शरीराच्या इतर अवयवांमध्ये पाणी जमा होण्याची शक्यता असते. हेच पाणी हृदयाच्या अवतीभोवती तयार झाल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतात. या स्थितीला पेरिकार्डियल इफ्यूजन असे म्हंटले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
हृदयाच्या अवतीभोवती पाणी तयार झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे हृदयाच्या बाहेरील थरामध्ये द्रव पदार्थ साचण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हृदयावर दाब येतो. पण शरीरात सौम्य लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे, अन्यथा हा आजार आणखीनच गंभीर होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हृदयात पाणी जमा झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
हृदयाच्या अवतीभोवती पाणी साचल्यामुळे हृदयावर दाब येऊ लागतो. यामुळे शरीरात जडपणा जाणवणे किंवा छातीमध्ये वेदना होऊ लागतात. ही समस्या प्रामुख्याने झोपल्यानंतर अधिक जाणवते. शरीरात साचून राहिलेले द्रव पदार्थ हृदयावर दाब टाकतात. त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक सारखी लक्षणे दिसू लागतात. छातीमध्ये वारंवार अस्वस्थता जाणवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील अवयवांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त व्यवस्थित पोहचत नाही. यामुळे शरीरातील पेशींना ऊर्जा न मिळाल्यामुळे सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. बऱ्याचदा सहज करता येणाऱ्या गोष्टी खूप जास्त त्रासद्याक वाटू लागतात.
महिलांमध्ये हृदय धक्क्यापूर्वी शरीर देतं काही संकेत; वेळीच ओळखाल तर नुकसान टाळलं
हृदयात साचून राहिलेल्या पाण्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह बिघडतो. याशिवाय साचून राहिलेल्या पाण्यामुळे शिरांमध्ये रक्ताचा दबाव वाढतो आणि गळ्याला सूज येऊ लागते. गळ्याला आलेल्या सुजेमुळे जेवणताना किंवा पाणी पिताना वेदना जाणवू लागतात. याशिवाय यामुळे गळ्याच्या रक्तवाहिन्या फुगल्या सारख्या दिसू लागतात. तसेच चेहऱ्याला सूज येणे, हातांवर सूज येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.