मुळांपासून निघून जाईल जुनाट मूळव्याध ! रामदेव बाबांनी सांगितलेले 'हे' पदार्थ उपाशी पोटी खा चावून
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात मसालेदार आणि तिखट पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे. आहारात सतत जंक फूड, बाहेरील तिखट तेलकट पदार्थ, अतितिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीरास पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा शरीरात मूळव्याध झाल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे मूळव्याधीची समस्या आणखीनच वाढत जाते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करावे. मूळव्याध झाल्यानंतर तो मुळांपासून काढून टाकण्यासाठी ऑपरेशन केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल ‘हे’ बारीक दाण्यांचे जादुई पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन
मूळव्याधीची समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. बद्धकोष्ठता, सतत अपचन होते, गॅस, पोटात दुखणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे मूळव्याधीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला मूळव्याध मुळांपासून काढून टाकण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले सोपे उपाय सांगणार आहोत. उपाशी पोटी हे पदार्थ चावून खाल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
मूळव्याधीची समस्या उद्भवल्यास नागदोनच्या पानाचे उपाशी पोटी सेवन करावे. ही पाने आयुर्वेदिक असतात. डोंगराळ भागात मिळणारी औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली पाने आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. ही पाणी चवीला आंबटगोड असतात. नागदोनच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली सूज, मूळव्याध, रक्त शुद्ध होणे गुदमार्गातील जळजळ कमी होणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. त्यामुळे मूळव्याध मुळांपासून काढून टाकण्यासाठी आहारात नागदोनच्या पानांचे सेवन करावे. हा उपाय अतिशय प्रभावी ठरतो, असा रामदेव बाबा यांचा दावा आहे.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली त्रिफळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे नागदोनच्या पानांसोबत तुम्ही त्रिफळा चूर्णाचे सेवन करू शकता. याशिवाय रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात त्रिफळा पावडर मिक्स करून प्यायल्यास शरीरातील सर्व घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. याशिवाय मूळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळेल. दोन्ही हातांच्या मनगटावरील वरचा भाग दाबल्यास शरीराचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होईल.
निरोगी आरोग्यासाठी पालेभाज्या अतिशय महत्वाच्या आहेत. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आहारात तुम्ही पालेभाज्या, फळं, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट इत्यादी भाज्यांचे नियमित सेवन करू शकता. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. याशिवाय शरीराला थंडावा मिळून शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होईल.