
20 पैशांची 'ही' गोळी हार्ट अटॅकपासून करेल शरीराचा बचाव, थंडगार वातावरणात लहानशी गोळी आरोग्यासाठी ठरेल गुणकारी
हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?
२० पैशांनी गोळी शरीरासाठी प्रभावी ठरते का?
हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो?
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात.सतत बदलणारे हवामान, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, तिखट आणि मसालेदार पदार्थांचे वाढते सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लगेच आरोग्यावर होतो. थंड वातावरणामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पोहचत नाही. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो आणि रक्तदाब वाढून रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. (फोटो सौजन्य – istock)
उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा उच्च कोलेस्टेरॉल इत्यादी गंभीर समस्यांपासून त्रस्त असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय शरीरात वाढलेल्या उच्च कोलेस्ट्रॉलचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला चिकट पिवळा थर रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण करतो. म्हणूनच आज आम्ही हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी कोणत्या २० पैशाच्या गोळीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही गोळी थंडीच्या दिवसांमध्ये कायमच खिशात ठेवावी.
हार्ट अटॅक किंवा हृद्यरोगापासून बचाव करण्यासाठी कमी किमतीची गोळी अतिशय प्रभावी ठरू शकते. या गोळीचे नाव ‘डिस्प्रिन’ (Disprin) किंवा तत्सम एस्पिरिन असे आहे. या गोळीच्या सेवनामुळे हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या समस्यांपासून तात्काळ आराम मिळेल. कोणत्याही कठीण प्रसंगात २० पैशांची गोळी जीव वाचवण्यासाठी गुणकारी ठरेल. या गोळीच्या सेवनामुळे हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या सुमारे २५ ते २८ टक्क्यांनी कमी होऊ शकते. हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी कायमच खिशात ही गोळी ठेवावी.
हार्ट अटॅक येण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये झपाट्याने रक्त गोठण्यास सुरुवात होते. या गाठी वाढल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होण्यासोबतच हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा होत नाही. अशावेळी डिस्प्रिनची खावी. या गोळीच्या सेवनामुळे रक्ताच्या प्लेटलेट्सना एकत्र येण्यापासून थांबवतात आणि रक्ताच्या गाठी तयार होत नाही. तसेच शरीराचा रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. गोळीच्या सेवनानंतर पुढील उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत.
Ans: जेव्हा हृदयाच्या स्नायूंच्या भागामध्ये रक्त प्रवाह अचानक कमी होतो किंवा पूर्णपणे थांबतो.
Ans: छातीच्या मध्यभागी दाब, जडपणा, घट्टपणा किंवा दुखणे जाणवणे, जे काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा जाऊन परत येते.
Ans: धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव, आणि अस्वास्थ्यकर आहार.